मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /maharashtra corona case : महाराष्ट्रात कोरोनाची पस्थितीत आणखी बिकट, मन हेलावणारी मृतांची आकडेवारी!

maharashtra corona case : महाराष्ट्रात कोरोनाची पस्थितीत आणखी बिकट, मन हेलावणारी मृतांची आकडेवारी!

 आज राज्यात 68,631 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकाच दिवसात 503 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 68,631 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकाच दिवसात 503 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 68,631 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकाच दिवसात 503 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, 18 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (maharashtra corona case) रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हॉस्पिटलपासून ते स्मशानभूमीपर्यंत जागाच शिल्लक नाही. आजही राज्यात कोरोनाबाधित नव्या रुग्णांनी 60 हजारांचा टप्पा ओलांटला आहे. तर सर्वाधिक मृतांची संख्या नोंद झाली आहे.

राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांची रुग्णांची संख्या जाहीर करण्यात आली आहे.  आज 45,654 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत एकूण 31,06,828 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 80.92 एवढे झाले आहे.

आज राज्यात 68,631  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकाच दिवसात 503 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.58% एवढा आहे. गेल्या काही दिवसातील आज मृतांची संख्या ही सर्वाधिक जास्त आहे.

Paparazzi ना पाहताच सुरू झाली लपवा-छपवी; अभिनेत्याने का लपवला चेहरा?

तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 26,529 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात एकूण ६,७०,३८८  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

नवी मुंबईत 50 वर्षांवरील रुग्णांवर घरी उपचार नाही!

दरम्यान, कोरोनाचे आकडे हे रोज मोठ्या संख्येनं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि त्याचबरोबर मृतांचे आकडेही प्रचंड वाढत आहेत. संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती आहे. नवी मुंबईतही कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र कोरोना रुग्णांच्या आकड्यांपेक्षा नवी मुंबई महानगर पालिकेसाठी चिंचेता विषय बनला आहे याठिकाणाचा मृत्यू दर.

IPL 2021 : कुटुंबाची मदत करण्यासाठी सोडलं होतं क्रिकेट, आज आयपीएलमध्ये पदार्पण

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नवी मुंबईत वाढलं आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आता मनपानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नवी मुंबईत होत असलेल्या मृत्यूचा विचार केला असता याठिकाणी होणाऱ्या एकूण मृत्यूपेक्षा 80 टक्के मृत्यू हे 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे आहेत. त्यामुळं या दृष्टीनं महापालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

First published:
top videos