चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

औद्योगिक क्षेत्रात आणि सिक्का व्यापाऱ्यांमध्ये मागणी वाढली, म्हणून चांदी वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 सप्टेंबर : आज सोन्या-चांदीच्या भावात तेजी आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 हजार 343 रुपयांनी वाढून सोनं 40 हजार 330 रुपये प्रति ग्रॅम झालं आहे. तर, चांदीच्या दरात 2 हजार 070 रूपयांची विक्रमी वाढ झाली आहे. आज एक किलोग्रॅम चांदीची किंमत 50 हजार 125 झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात आणि सिक्का व्यापाऱ्यांमध्ये मागणी वाढली, म्हणून चांदी वाढली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 1, 537 डॉलर प्रति औस झाली आहे. तर चांदीचे दर 19.27 डॉलर प्रति औस झाली आहे.

सोन्याचा दर वाढण्याचं कारण

एचडीएफसी सिक्युरिटीचे सीनियर अनॅलिस्ट तपन पटेल म्हणाले, अमेरिका-चीनमधल्या वाढत्या ट्रेड वाॅरमुळे सोन्याची किंमत वाढलीय. अमेरिकानं चीनवर नवा टॅरिफ लावलाय. तो 1 सप्टेंबरपासून लागू झालाय. याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर झालाय.डाॅलरच्या तुलनेत रुपया कमी आहे. रुपया 72.40 प्रति डाॅलरवर बंद झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील फेरबदलामुळं वाढले भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात जून महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने 5 वर्षांतला उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांनी सोन्यामधल्या गुंतवणुकीला पसंती दिल्यामुळे ही स्थिती होती. आता मात्र घटलेल्या दरांमुळे दिलासा मिळाला आहे. भारतात दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर खरेदीतही घट होते. पण आता सोन्याबरोबरच चांदीचेही भाव घटल्यामुळे विक्रीमध्ये तेजी येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

First published: September 4, 2019, 8:20 PM IST
Tags: gold rate

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading