26/11च्या भीषण हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी वाहिली शहिदांना आदरांजली

26/11च्या भीषण हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी वाहिली शहिदांना आदरांजली

जगात असं पहिल्यांदा झालं होतं की एका दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी जिवंत पकडलं. हल्ल्याला ९ वर्षं झाले तरी त्या भयावह आठवणी, त्या जखमा अजूनही आहेत. जे गेले त्यांचं दुःख न विसरण्यासारखं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 26/11च्या हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झालीयेत. २६ नोव्हेंबर 2008च्या रात्री मुंबईत १० दहशतवाद्यांनी निष्पापांची कत्तल करत हाहाकार माजवला होता. यामध्ये १६६ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाबला जिवंत पकडलं होतं.

जगात असं पहिल्यांदा झालं होतं की एका दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी जिवंत पकडलं. हल्ल्याला ९ वर्षं झाले तरी त्या भयावह आठवणी, त्या जखमा अजूनही आहेत. जे गेले त्यांचं दुःख न विसरण्यासारखं आहे. पण प्रश्न उरतो तो हा, की असा हल्ला पुन्हा होऊ नये, यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे का, सक्षम आणि अत्याधुनिक आहे का. दुर्दैवानं बहुतांश बाबींमध्ये याचं उत्तर नाही असंच येतं.

26/11मध्ये जे पोलीस अधिकारी शहीद झाले होते, त्यांच्या स्मारकावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात पोलीस जिमखाना आहे. तिथे हे स्मारक उभारण्यात आलंय.

First published: November 26, 2017, 1:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading