राज्य मंत्रिमंडळ बैठक
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मागील आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आजच्या या बैठकीत राज्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कोणत्या घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'हर घर भाजप' भाजपचे कॅम्पेन
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्या दृष्टीनेच 'हर घर भाजप' या भाजपच्या कॅम्पेनची आज मुख्यमंत्री फडणवीस सुरुवात करणार आहे.
ममतादीदी दिल्लीत
पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहे. मागील आठवड्यात सीबीआय विरुद्ध पोलीस नाट्यामुळे ममता दीदींनी मोदी सरकारविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच ममतादीदी दिल्लीत पोहोचणार आहे.
आदित्य ठाकरे सोलापूर दौऱ्यावर
शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहे. काल त्यांनी उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पशूधनही वाटप केलं होतं. तसंच 'मी शहरी बाबू पीकं येते कसं, पेरणी कधी करतात कशी करतात माहीत नाही. मात्र, तुम्ही शिवसेनेला हाक दिली ती हाक ऐकून आलो', असं सांगत उपस्थिती लोकांची मनं जिंकली होती.
नाट्य परिषदेची घोषणा
नागपुरात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांची निवड झाली आहे. आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत नाट्य संमेलनाबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
===============================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा