घर योजनेची माहिती देण्यासाठी मुंबईत भाजपची 'गरीब-रथ यात्रा'

टाळ-मृदुंगाच्‍या गजरात भाजपाच्‍या या गरिब रथाची सुरूवात झाली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2018 09:31 AM IST

घर योजनेची माहिती देण्यासाठी मुंबईत भाजपची 'गरीब-रथ यात्रा'

12 फेब्रुवारी : 2011पर्यंतच्या झोपडीधारकांना पक्के घर देण्याचा निर्णय भाजप सरकारनं घेतला आहे. या बाबतची माहितीमुंबईभर पोहचवण्यासाठी भाजपने एका अनोख्या यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेचं नाव आहे 'गरीब-रथ यात्रा'. टाळ-मृदुंगाच्‍या गजरात भाजपाच्‍या या गरिब रथाची सुरूवात झाली आहे.

भाजपची ही यात्रा मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये फिरणार आहे. या यात्रेदरम्यान मुंबईत भाजप नेत्यांच्या दररोज दोन सभा होणार आहेत. आणि त्यात विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेला सुरुवात करण्यात आली. घर योजनेसंबंधीची माहिती घरोघरी पोहचवण्यासाठी आम्ही गरीब-रथ यात्रेचं आयोजन केलं आहे. असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 09:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...