मुंबई 28 मे: कोरोना व्हायरसच्या सध्याच्या काळात ‘मास्क’हा आपल्या आयुष्याचा आता भाग झालाय. जोपर्यंत कोरोनावर लस निघत नाही तोपर्यंत ‘मास्क’वापरणं जगभरच बंधनकारक करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क हा घालणं सक्तिचं करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्क सगळ्यात महत्त्वाचा आहे. मात्र कायम मास्क घालण्याचा कंटाळा आला असेल तर नाकात घालण्यासाठी आता काही कंपन्यांनी फिल्टर्सही बाजारात आणले आहेत.
अतिशय छोट्या आकाराचे हे फिल्टर्स नाकात घातले तर प्रदुषण अलर्जी आणि व्हायरस पासून संरक्षण होतं असता दावा या कंपन्यांनी केला आहे. 200 ते 500 रुपयांपर्यंत हे फिल्टर्स उपलब्ध असून ते ऑनलाईनही विक्रिस उपलब्ध आहेत.
नाकपुड्यांच्या मधून ते फिल्टर्स आता टाकावे लागतात आणि स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात. अनेक चाचण्यानंतर हे फिल्टर्स तयार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कोरना व्हायरसनंतर लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले तर अनेक नव्या संधी तयार झाल्या आहेत.
मास्क, पीपीटी किट, कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणारी साधणं, तात्पुरते बेड्स, व्हेंटिलेटर्स या उत्पादनांना चांगली मागणी आहे.
हेही वाचा -भाजपच्या या फ्रायरब्रँड प्रवक्त्यालाही कोरोनाची लक्षणं, हॉस्पिटलमध्ये केलं दाखलमुंबईहून बिहारला पोहोचली गर्भवती महिला, बाळाचं नाव ठेवलं 'सोनू सूद'विद्यार्थ्यांनी 11 लाख जमा करुन मुंबईतील 174 मजुरांना विमानाने पाठवलं गावी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.