मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Covid Lockown Thane: ठाण्यात 'लॉकडाउन'चे निर्बंध कडक? वाचा काय आहे सत्य...

Covid Lockown Thane: ठाण्यात 'लॉकडाउन'चे निर्बंध कडक? वाचा काय आहे सत्य...

Coronavirus lockdown in thane: कोरोनाचा फैलाव (Coronavirus hotspots in Thane) मुंबईबरोबर ठाण्यात वाढला आहे. Containment zones सुद्धा वाढल्याने लॉकडाउनची चर्चा सुरू आहे.

Coronavirus lockdown in thane: कोरोनाचा फैलाव (Coronavirus hotspots in Thane) मुंबईबरोबर ठाण्यात वाढला आहे. Containment zones सुद्धा वाढल्याने लॉकडाउनची चर्चा सुरू आहे.

Coronavirus lockdown in thane: कोरोनाचा फैलाव (Coronavirus hotspots in Thane) मुंबईबरोबर ठाण्यात वाढला आहे. Containment zones सुद्धा वाढल्याने लॉकडाउनची चर्चा सुरू आहे.

ठाणे, 9 मार्च:  मुंबईबरोबरच (Covid-19 updates mumbai news) शेजारचं उपनगर असलेल्या ठाण्यात कोरोना रुग्णांचं (Thane lockdown news) प्रमाण प्रचंड वाढू लागलं आहे. दैनंदिन रुग्णवाढ वाढली आहे त्याबरोबरच कोरोनाव्हायरचा फैलावही (Coronavirus hotspots in Thane) वाढला आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रंसुद्धा (Containment zones in Thane) वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन (Lockdown in thane) लागणार का याची चर्चा सुरू होती. 31 मार्चर्यंत लॉकडाऊन वगैरे बातम्यांना त्यामुळे पेव फुटलं. ठाणे महापालिकेनेसुद्धा हॉटस्पॉटक्षेत्रात कडक लॉकडाऊन असं सांगितल्याने चर्चांना आणि अफवांना उधाण आलं. आपल्या लॉकडाऊन धोरणावर स्पष्टीकरण देताना ठाणे महापालिकेने हे स्पष्ट केलं आहे की, शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन नाही; नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (micro containment zone) असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले आहेत. तेच निर्बंध आता वाढवण्यात आल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. मंगळवारी ठाणे महापालिकेनंं हे ट्वीट करत मायक्रो कंटन्मेंट झोनबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर लॉकडाउन चर्चांंना उधाण आलं. महापालिकेचं ठाणेकरांना आवाहन ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॅाटस्पॅाटची (Covid hotspots thane) निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी Covid-19 चे रूग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना धोका वाढला या उच्चभ्रू भागामुळे; हॉटेल्स, पब्जमुळे वाढला आकडा कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते त्यानुसार सुरू राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोना लसीकरणानंतर 48 तास वैमानिकांना उड्डाणास मनाई, DGCA ची सूचना सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत त्या आस्थापना यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
First published:

Tags: Corona hotspot, Corona vaccination, Coronavirus, Covid cases, Lockdown, Mumbai, Thane

पुढील बातम्या