ठाण्यातही 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ? उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय

ठाण्यातही 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ? उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय

ठाण्यात 500 चौरस फुटार्पयतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन 2017 च्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने दिलं होतं.

  • Share this:

ठाणे13 फेब्रुवारी: मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने मालमत्ता करमाफीचा निर्णयही घेतला होता. आता  त्याच धर्तीवर ठाण्यातही 500 चौरस फुटार्पयतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय केव्हा घेणार असा सवाल विचारला जातोय. शिवसेनेने असं आश्वासन 2017 च्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी दिलं होतं. परंतु त्याची पुर्तता अद्यापही झालेली नाही. आता तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आणि मुख्यमंत्रीपदावर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हेच असल्याने हा मार्ग सुकर झाला आहे असं बोललं जातेय.

शिवसेनेच्या या आश्वासनाची आठवण मनसेने शिवसेनेला करून दिलीय. या विषयावर मनसेने 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा  यासाठी महापौर नरेश म्हस्के याना निवेदन दिले आहे. तर या  दिलेले वचन शिवसेना पूर्ण करून दाखवणार आहे. मनसेने केलेली ही मागणी आम्हीच पहिल्यांदा केली होती.  त्यात काहीही नवीन नाही. यावर लवकरात लवकर मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  निर्णय जाहीर करतील असंही ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.

शिवसेनेनेनं रद्द केलेला शरद पोंक्षे यांचा `अथांग सावरकर' कार्यक्रम भाजप करणार

काय आहे मुंबईतला निर्णय?

निवासी इमरातींमधली घरं आणि गाळे यांना हा नियम लागू होईल. या निर्णयाचा लाभ जवळपास 17 लाख घरधारकांना होणार आहे, असा दावा सरकारने केला होता. मुंबईत जी घरं 500 स्क्वेअर फूटाच्या आतली आहेत, त्यांत मध्यमवर्गीय गटाची संख्या जास्त आहेत. यामधल्या अनेक इमारती पुनर्बांधणीसाठीही गेल्या आहेत. नव्या इमारतीचा मालमत्ता कर तुलनेनं जास्त असतो.

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा

500 स्क्वेअर फुटाच्या आतली नवी घरंही या नियमात आहेत. या कारणानंही हा मध्यमवर्गीय मुंबईकरांना मोठा दिलासा आहे. 2017 साली होणार्‍या मुंबई महानगरपालिका निवडणुकींना डोळ्यासमोर ठेऊन सरकारनं हा निर्णय घेतलाय का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 08:51 AM IST

ताज्या बातम्या