Home /News /mumbai /

टीपू सुलतान मैदान वादाला नवे वळण, भाजपने केला नवा दावा

टीपू सुलतान मैदान वादाला नवे वळण, भाजपने केला नवा दावा

हा भूखंड मुंबई महानगरपालिकेकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी वर्ग करण्यात आल्याचे उघड झाल्यावर महापालिका कारवाई करणार का?

हा भूखंड मुंबई महानगरपालिकेकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी वर्ग करण्यात आल्याचे उघड झाल्यावर महापालिका कारवाई करणार का?

हा भूखंड मुंबई महानगरपालिकेकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी वर्ग करण्यात आल्याचे उघड झाल्यावर महापालिका कारवाई करणार का?

मुंबई, 27 जानेवारी : मुंबईतील  (mumbai ) मालाड मालवणी  परिसरातील मैदानाला टीपू सुलतान (tipu sultan ground malad west) यांचे नाव देण्यावरून भाजपने (bjp) जोरदार आक्षेप घेत वाद घातला आहे. आता याच मुद्यावरून भाजपने काही पुरावे सादर करत आता शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दलची कागदपत्रच भाजप नेत्यांनी जाहीर केली आहे. मालवणीमधील मैदानाचे उद्घाटन शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानाला वीर टिपू सुलतान उद्यान असे नाव देण्यात आले. पण टिपू सुलतान यांच्या नावाला भाजपने विरोध केला आहे. प्रजासत्ताक दिनी या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनापूर्वी भाजपच्या वतीने या ठिकाणी जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आली. आज भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा भूखंड जिल्हाधिकार्‍यांनी 28 जानेवारी 2020 ला मुंबई महानगरपालिकेला वर्ग केल्याचा दावा केला आहे. शिवाय या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कोणत्याही प्राधिकरणाकडे आलेला नाही, असंही भाजपचं म्हणणं आहे. (108 MP कॅमेरा असलेला Redmi Note 11 Pro 5G मोबाईल भारतात लवकरच लाँच होणार) तर दुसरीकडे या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. आता हा भूखंड मुंबई महानगरपालिकेकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी वर्ग करण्यात आल्याचे उघड झाल्यावर महापालिका कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे. (VIDEO : 'अनिता भाभी'वर चढला इंग्लिश गाण्याचा फिव्हर; नेहा पेंडसेचा किलर अंदाज) तर टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध हे केवळ ढोंग असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप जाणीवपूर्वक वादंग निर्माण करत आहे, असा पलटवार कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार नेमके काय निर्णय घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

Tags: भाजप

पुढील बातम्या