उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक तर बदलापूर-कर्जतदरम्यान उद्या 'पूल'ब्लॉक

उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक तर बदलापूर-कर्जतदरम्यान उद्या 'पूल'ब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 02 मे : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा ते ठाणे डाऊन धीम्या मार्गावर स. ११.२० ते दु. ४.२० पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.

तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान अप-डाऊन मार्गावर स. ११.१० ते दु. ४.४०पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. तसंच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत स. १०.३५ ते दु. ३.३५पर्यंत दोन्ही मार्गांवर ब्लॉक आहे.

मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. बदलापूर ते कर्जत स्थानकांमध्ये उद्या सकाळी १०.३० ते दुपारी २.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक राहील. या कालावधीत लोकल, मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीत काही प्रमाणात बदल केले जाणार आहेत.

 

First published: June 2, 2018, 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading