मोदींच्या 'मन की बात'नंतर अमृता फडणवीसांना ट्रोल्सचा फटका; टीकाकारांना ट्वीट करत म्हणाल्या...

मोदींच्या 'मन की बात'नंतर अमृता फडणवीसांना ट्रोल्सचा फटका; टीकाकारांना ट्वीट करत म्हणाल्या...

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या नव्या गाण्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. याबाबत ट्वीट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर : अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांचं 'तिला जगू द्या' गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरणावर भाष्य करणारं हे गाणं आहे. या व्हिडीओला 2 दिवसांत  10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.पण  या गाण्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. यूट्यूबवर जवळजवळ 5 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या गाण्याला डिसलाइक केलं आहे.

तिला जगू या गाण्याला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, ‘महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांत या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईन’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या एका भागालाही अशाप्रकारे डिसलाइक्सचा पाऊस पडला होता. अमृता फडणवीस यांची स्वत:ची अशी एक खास ओळख आहे. केवळ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी म्हणूनच नाही तर गायिका, बँकर आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. राजकारणाबाबतही त्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.

अमृता फडणवीस यांचं आधीचं गाणंही महिलांच्या बाबतीतलंच होतं. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं त्यांनी गायलं होतं. अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है असे या गाण्याचे बोल होते.  अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही टीका केली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 17, 2020, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading