टिकटॉक वर पोस्ट केला लिंचिंगविरुद्धचा व्हिडिओ, नंतर मागितली माफी

टिकटॉक वर पोस्ट केला लिंचिंगविरुद्धचा व्हिडिओ, नंतर मागितली माफी

झारखंडमध्ये घडलेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा बदला म्हणून टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. मुंबईतल्या पाच तरुणांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या पाचही तरुणांवर मुंबईच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केला.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : झारखंडमध्ये घडलेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा बदला म्हणून टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. मुंबईतल्या पाच तरुणांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या पाचही तरुणांवर मुंबईच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केला. शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी याबद्दल तक्रार केली होती.

यानंतर मात्र या तरुणांनी माफी मागितली असून हा व्हिडिओही सोशल मीडियावरून हटवला आहे. तबरेज अन्सारी याच्या हत्येचा निषेध आम्ही करत आहोत, असं या तरुणांनी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. आता तबरेज यांच्या मुलाने या घटनेचा बदला घेतला तर मग, मुस्लीम लोक दहशतवादी असतात, असं म्हणू नका, असं या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं.

World Cup : धोनीचे वर्ल्ड कप 2019 जिंकण्याचे स्वप्न भंगले, आता घेणार निवृत्ती?

हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल झाला. शिवसेनेचे रमेश सोळंकी यांनी एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या व्हिडिओमुळे समाजात तेढ निर्माण केली जात होती. त्यामुळे यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोळंकी यांनी केली होती.

तक्रारीनंतर मागितली माफी

या व्हिडिओविरोधात सायबर सेलमध्ये FIR दाखल झाल्यानंतर या तरुणांनी माफी मागितली आणि हा व्हिडिओही काढून घेतला. त्याआधी हा व्हिडिओ 07 या नावाने टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता.

फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधान फारुकी या पाच तरुणांनी हा व्हिडिओ बनवला होता. त्यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला.

तबरेज अन्सारी हत्या प्रकरण

झारखंडमध्ये तबरेज अन्सारी याला चोरीच्या संशयावरून जमावाने दगडाने ठेचून मारलं होतं. त्याला जबरदस्तीने जय श्रीराम आणि जय हनुमान च्या घोषणा द्यायला लावण्यात आल्या, असंही समोर आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये, ही घटना दुर्दैवी असल्याची कबुली दिली होती पण या घटनेसाठी झारखंड राज्यालाच दूषणं देता येणार नाहीत,असं ते म्हणाले होते.

गेल्या दोन वर्षांत 18 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाला असून सरकार यावर काहीच करत नाही, असा विरोधकांचा आरोप होता.

====================================================================================

SPECIAL REPORT : ही मुंबई नव्हे अमेरिका, ट्रम्प यांच्याही घरात शिरले पाणी!

First published: July 10, 2019, 8:46 PM IST

ताज्या बातम्या