VIDEO : TikTok वर या शेफचा व्हिडिओ होतोय ट्रेंड, लोक म्हणतात, 'ब्रेकअप'मुळे झाली ही अवस्था

VIDEO : TikTok वर या शेफचा व्हिडिओ होतोय ट्रेंड, लोक म्हणतात, 'ब्रेकअप'मुळे झाली ही अवस्था

TikTok या सोशल मीडिया अ‍ॅपवर काय हिट होईल हे काही सांगता येत नाही. सध्या एका शेफचा व्हिडिओ TikTok वर ट्रेंड होतोय. या व्हिडिओमध्ये एक शेफ जी डिश बनवतोय ती अशा पद्धतीने बनवतो आहे की लोकांचं चांगलंच मनोरंजन झालं.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : TikTok या सोशल मीडिया अ‍ॅपवर काय हिट होईल हे काही सांगता येत नाही. सध्या एका शेफचा व्हिडिओ TikTok वर ट्रेंड होतोय. या व्हिडिओमध्ये एक शेफ जी डिश बनवतोय ती अशा पद्धतीने बनवतो आहे की लोकांचं चांगलंच मनोरंजन झालं.

टिकटॉक (TikTok)व्हिडिओजची क्रेझ सगळ्यांमध्येच पाहायला मिळतेय. गावापासून ते शहरापर्यंत अनेक जण या टिकटॉक व्हिडिओचे फॅन आहेत. टिकटॉक वर फनी व्हिडिओज, मेकअप ट्युटोरियल किंवा रेसिपी व्हिडिओज पोस्ट केले जातात.

असाच या शेफचा व्हिडिओ टिकटॉकवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा शेफ ऑरेंज क्रेप बनवतो आहे. अंडी आणि संत्र्यांचा ज्यूस वापरून ही डिश बनवली जाते. जी रेसिपी पटकन बनवता येईल ती रेसिपी हा शेफ अगदी मंदगतीने बनवतो आहे.

शेफच्या या व्हिडिओला 5 लाख 70 हजार लाइक्स मिळाले. 250 पेक्षा जास्त लोकांनी यावर कॉमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे, तो जे करतोय ते पाहून असं वाटतं, त्याचा प्रेमभंग झाला आहे !

एकाने या व्हिडिओला स्लो मोशन व्हिडिओ म्हटलं आहे तर आणखी एकजण विचारतो, तो जे करतोय ते आज तरी बनेल ना ?

अंडरवेअर्सच्या विक्रीत घट, डेटिंग वाढलं, हे आहे आर्थिक मंदीचं कनेक्शन!

टिकटॉक हे एक सोशल मीडिया अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर स्मार्टफोन युझर्स छोटेछोटे व्हिडिओ पोस्ट करत असतात. या व्हिडिओमध्ये युझरला आवाज द्यावा लागत नाही, त्याने फक्त लिपसिंक करायचं असतं. या व्हिडिओला तर असा कोणताही आवाज नाही पण तरीही तो फारच मजेशीर आहे.

=============================================================================

VIDEO : अजय-अतुल यांच्यासमोर पुणेरी ढोल-ताशापथकाचा धडाकेबाज परफॉर्मन्स

Published by: Arti Kulkarni
First published: August 17, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading