News18 Lokmat

पहिल्याच दिवशी एसी लोकलमध्ये पकडला फुकटा प्रवाशी !

मुंबईत एसी लोकल सुरू होऊन एक दिवसही उलटला नाही तेच एका फुकट्या प्रवाशाला पकडण्यात आलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2017 07:17 PM IST

पहिल्याच दिवशी एसी लोकलमध्ये पकडला फुकटा प्रवाशी !

26 डिसेंबर : आपल्याकडे कधीही चांगली गोष्ट घडली तर त्याची कशी वाट लावायची हे काही महाभागांना चांगलंच जमतं. मुंबईत एसी लोकल सुरू होऊन एक दिवसही उलटला नाही तेच एका फुकट्या प्रवाशाला पकडण्यात आलंय.

सोमवारी ख्रिसमसच्या दिवशी बहुप्रतिक्षित देशातली पहिली एसी लोकल मुंबईत धावली. पश्चिम मार्गावर चर्चगेट ते विरार एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. पहिल्याच दिवशी एसी लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडण्यात आलंय. या प्रवाशाकडून 435 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. यात 165 रुपये भाडे, 250 दंड आणि 10 रुपये सीजीएसटी आणि 10 रुपये एसजीएसटी मिळून एकूण 435 वसूल करण्यात आले आहे. हा फुकटा प्रवाशी चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढला होता.

25 डिसेंबरला एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालीये. या लोकलचं मुंबईकरांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. 1 जानेवारी 2018 पासून एसी लोकलच्या 12 फेऱ्या वाढणार आहे. एसी लोकलचे कमीतकमी भाडे हे 60 रुपये असून जास्तीत जास्त तिकीट 205 रुपये आहे. तर मासिक पास हा 570 पासून 2070 इतका आहे. 6000 प्रवाशांची या लोकलची क्षमता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...