अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामा-भाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव, धक्कादायक घटना

अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामा-भाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव, धक्कादायक घटना

जंगलात एका झाडाला साडीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले तिघे...

  • Share this:

ठाणे, 21 नोव्हेंबर: ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर (Shahapur, thane) तालुक्यात चांदा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरत्त्व मिळवण्यासाठी केलेल्या अघोरी विद्येच्या (Black Magic) प्रयत्नात तीन तरुणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील चांदा गावातील मामाभाचे व शहापूर येथील एका विवाहित तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे.

तिघांनी गावापासून जवळच्या जंगलात जाऊन एका झाडाला साडीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी प्राथिमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा..कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..

मिळालेली माहिती अशी की, 14 नोव्हेंबरला म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या अमावस्येला रात्री 11 च्या सुमारास नितीन भेरे (वय-35, रा. शहापूर), महेंद्र दुभेले (वय-30, रा.चांदा, खर्डी) व मुकेश घावट (वय-22, रा.चांदा, खर्डी) हे तिघे बेपत्ता झाले होते. त्यानंतर शोधा शोध सुरु असताना या तिघांचे मृतदेह जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले

तिघांचे मृतदेह ज्या पद्धतीने आढळलेत आणि आधीपासून या तिघांबाबत परिसरात वेगळीच चर्चा होती. त्यानुसार एक तर लक्ष्मीपूजन अमावस्येच्या रात्री मुक्ती मिळवण्यास म्हणजेच अमरत्व मिळवण्यास तिघांनी लटकून घेतलं असावं. तर यांनी कोणाला तरी मुक्ती मिळवून देण्याचे सांगितले होते. पण ते न झाल्याने या तिघांची कोणीतरी हत्या केली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हत्या की आत्महत्या या दोन्ही थेअरीनुसार शहापूर पोलिस तपास करत आहेत.

दुसरीकडे, एक घटनेनं मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत एका चिमुकलीवर 2 अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape)केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 वर्षाच्या चिमुरडीवर 2 अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.

हेही वाचा... मुंबई हादरली! 3 वर्षाच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याबाबत तपास करत आहेत. आरोपींनी हा गुन्हा का केला? पीडित मुलीला ते कधीपासून ओळखत होते याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 21, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या