मुंबईत नरबळी.. त्याने मित्राच्याच जुळ्या मुलांची हत्या करण्याचा असा घेतला निर्णय

कुलाब्यातील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून शनाया हाथीरामाणी या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. परंतु हा अपघात नसून घातपात होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. नरबळीच्या उद्देशाने शनायाची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 01:39 PM IST

मुंबईत नरबळी.. त्याने मित्राच्याच जुळ्या मुलांची हत्या करण्याचा असा घेतला निर्णय

मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबईतला उच्चभ्र समजल्या जाणाऱ्या कुलाबा परिसरात तीन वर्षांच्या चिमुरडीचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (7 सप्टेंबर) कुलाब्यातील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून शनाया हाथीरामाणी या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. परंतु हा अपघात नसून घातपात होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. नरबळीच्या उद्देशाने शनायाची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी मारेकरी अनिल जुगाणी याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी अनिल जुगाणी हा काही वर्षे मोरक्कोत वास्तव्य करत होता. तो सहा महिन्यापूर्वीच मुंबईत परतला. मोरक्कोत एका महिलेने त्याच्यावर जादुटोणा केला होता. यातून बाहेर यायचे असेल तर दोन जुळ्या मुलांचा नरबळी द्यावा लागेल, असा तोटका करण्यास अनिलला सांगण्यात आले होते. अनिल मुंबईत आल्यानंतर सातत्याने त्याच्या डायरीत दोन जुळ्यांची हत्या कर, जेलमध्ये जा आणि स्वतःला वाचव,असे लिहीत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली आहे.

मित्राच्याच जुळ्या मुलींची हत्या करण्याचा घेतला निर्णय...

अनिल जुगाणी याने त्याच्या मित्राच्याच जुळ्या मुलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. अनिलने शनिवारी शनाया आणि तिच्या जुळ्या भावाला आपल्या घरी आणले. शनायाला इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली फेकले. मात्र, तितक्यात शनायाची आया आल्याने तिचा भाऊ थोडक्यात बचावला.

Loading...

बँक कर्मचाऱ्याकडून 2 लाख लुटले, गोळीबार करून पळाले LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...