मुंबईत क्रेन कोसळून 3 कामगारांचा मृत्यू

मुंबईत क्रेन कोसळून 3 कामगारांचा मृत्यू

पवई येथे शौचालय पाईप लाईनचे काम सुरू आहे. क्रेनच्या साहयाने जमिनीच्या खालील गाळ काढत असताना क्रेनची वायर तुटली

  • Share this:

01 जानेवारी : मुंबईतील पवई येथील आयआयटी गेटसमोर क्रेन कोसळून  3 जणांचा मृत्यू झालाय. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पवई येथे शौचालय पाईप लाईनचे काम सुरू आहे. क्रेनच्या साहयाने जमिनीच्या खालील गाळ काढत असताना क्रेनची वायर तुटली आणि 3 कामगार मृत पावले आणि दोन जखमी झाले.

कोरट सिंह, 49 रामनाथ सिंग वय 38 वर्षे अशी जखमी झालेल्यांची नाव असून मृतकची ओळख अद्याप पटली नाही. राजावाडी रुग्णालयात जखमींची भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी भेट घेतली. यावर कामगार आयुक्तांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असे सोमय्या यांनी म्हंटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 10:40 PM IST

ताज्या बातम्या