कोपरखैराण्याहून फिरायला गेलेल्या तिघांचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

कोपरखैराण्याहून फिरायला गेलेल्या तिघांचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

अलिबागच्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या कोपरखैराण्यातील 13 जणांपैकी 3 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

  • Share this:

अलिबाग, ता. 26 मे : अलिबागच्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या कोपरखैराण्यातील 13 जणांपैकी 3 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. आपल्या सोबत खेळणाऱ्या मित्रांच्या अशा अचानक जाण्याने इतर मित्रांना आणि मृतांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

खोल समुद्रात पाण्याचा अदांज न आल्यानं या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. चैतन्य किरण सुळे (20), आशिष रामनारायम मिश्रा (20), आणि फहाद सिद्धीकी वय (21) अशी या मृतांची नावं आहेत. दरम्यान, ते पाण्याच बुडाले असता एकाने आरडा-ओरड करून सगळ्यांना मदतीसाठी बोलवून घेतलं. पण पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

यातील चैतन्य सुळेचा मृतदेह आज सकाळी आठ वाजता बोरली मांडला येथील समुद्रकिनारी सापडला. तर आशिष मिश्रा आणि फहाद सिद्धीकी या दोघांचे मृतदेह कोर्लई येथील समुद्रकिनारी सापडले.

 

First published: May 26, 2018, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading