विक्रोळी मनसे नेत्यांवर हल्ल्याप्रकरणी ३ जणांना अटक

विक्रोळी मनसे नेत्यांवर हल्ल्याप्रकरणी ३ जणांना अटक

या घटनेनंतर पोलिसांनी विक्रोळीतून 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

27 नोव्हेंबर : मुंबईतील विक्रोळी भागात मनसे नेत्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही हल्लेखोरांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर या हल्ल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले मनसेचे उपशाखाप्रमुख उपेंद्र शेवाळे आणि शिंदे यांच्यावरही फेरीवाल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात फेरीवाल्यांनी  शेवाळेंच्या डोक्यात पेव्हर ब्लाॅक घातला. शेवाळे यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी विक्रोळीतून 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विक्रोळीत मनसे नेत्यांवर झालेला हल्ला हा काँग्रेस नेत्यांच्या चित्ताथावनीवरुनच झालाय असा आरोप मनसेनं केलाय.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावलीये. या बैठकीनंतर राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

First published: November 27, 2017, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading