अश्‍लील मेसेजनंतर 'त्या' भामट्याने महिलेला पोस्टाने पाठवल्या तीन पॅन्टीज!

अश्‍लील मेसेजनंतर एका भामट्याने महिलेला पोस्टाने तीन पॅन्टीज पाठवल्याची घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 04:15 PM IST

अश्‍लील मेसेजनंतर 'त्या' भामट्याने महिलेला पोस्टाने पाठवल्या तीन पॅन्टीज!

मुंबई, 5 ऑगस्ट- अश्‍लील मेसेजनंतर एका भामट्याने महिलेला पोस्टाने तीन पॅन्टीज पाठवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपी प्रदोष रामकृष्ण नाईक (वय-36) याला गोव्यात अटक केली आहे. आरोपी भारतीय पुरातत्त्व विभागात नोकरी करतो. यापूर्वीही त्याने पीडित महिलेला अश्‍लील व्हाईस मेसेज पाठवला होता. पीडितेने या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती.

काय आहे हे प्रकरण?

पीडितेला 15 जून रोजी राहत्या घराच्या पत्त्यावर पोस्टाने एक पार्सल आले होते. 'तुझ्यासाठी विशेष गिफ्ट, तीन पॅन्टीज फक्‍त तुझ्यासाठी, मला विश्‍वास आहे तुला आवडतील, प्लीज त्या घाल.' असा अश्‍लील मेसेज पार्सलवर लिहिला होता. या प्रकाराची पीडितेने पोस्टात चौकशी केली असता ते काळबादेवी येथून आल्याचे स्पष्ट झाले. नंतर पीडितेने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पोस्टाकडे या महिलेला आलेल्या पार्सलबाबतची माहिती मागवली. गोव्यातील वास्को रेल्वे स्थानकाजवळील पोस्टातून ते पार्सल पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले. आरोपी प्रदोष नाईक हा गोव्यातील फोंडा परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. वर्षभरापासून पीडितेला अश्लीस मेसेजही प्रदोष नाईक हाच पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कुत्र्याबाबत चौकशी करत केली होती ओळख..

पीडित महिला मरिन ड्राईव्ह येथे आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी आली असता आरोपी प्रदोष नाईक याने कुत्र्याबाबत चौकशी करत तिच्याशी ओळख केली होती. बीबीसीआयचा पहिल्या दर्जाचा पंच असल्याचा दावाही आरोपीने यावेळी केला होता. नंतर महिलेला लॅंडलाईन तसेच मोबाइलवरून फोन करून ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर व्हॉट्सअ‍ॅपवरून तिला अश्‍लील मेसेज पाठवू लागला. महिलेने व्हॉट्‌सअ‍ॅपवर त्याला ब्लॉक केले. नंतरही तो थांबला नाही. त्याने महिलेला पोस्टाने चक्क तीन पॅन्टीज पाठवल्या. दरम्यान, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर गोव्यातील वास्को येथील कामाच्या ठिकाणी गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केले. महिलेला वास्को येथील टपाल कार्यालयासह मुंबईतील जीपीओ येथूही अंतर्वस्त्र पाठवल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत कबूल केले आहे.

Loading...

Article370 रद्द केल्याच्या आनंदात गिरीष महाजन नाचू लागले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...