PMC बँक घोटाळा: ह्रदयविकाराने दोन खातेदारांच्या मृत्यूनंतर डॉक्टरची आत्महत्या

PMC बँक घोटाळा: ह्रदयविकाराने दोन खातेदारांच्या मृत्यूनंतर डॉक्टरची आत्महत्या

योगिता बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या केल्याचं उघड झालंय. त्याचं PMC बँकेत खातं असून त्यात त्यांचे 1 कोटी रुपये अडकले आहेत.

  • Share this:

मुंबई 16 ऑक्टोंबर : पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी  (PMC Bank Scam) अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बँकेत लाखो रुपये अडकल्याने तणावामुळे दोन खातेदारांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता आणखी एक आत्महत्येचं प्रकरण समोर आलंय. वर्सोव्यात राहणाऱ्या डॉक्टर योगिता बिजलानी (39) यांनी झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या केल्याचं उघड झालंय. त्याचं PMC बँकेत खातं असून त्यात त्यांचे 1 कोटी रुपये अडकले आहेत. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. या आधी संजय गुलाटी आणि फत्तेमुल पंजाबी या दोन खातेदारांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला होता. योगिता बिजलानी या आधीच डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांनी अमेरिकत असतानाही आत्महत्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी थेट या बँक घोटाळ्याचा संबंध आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

दोन खातेदारांचा मृत्यू

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेच्या आणखी एका खाताधारकाचा मंगळवारी मृत्यू झाला. 59 वर्षीय फत्तोमल पंजाबी यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला होता. त्यांचे नातेवाईक दीपक पंजाबी यांनी सांगितले की, पीएमसी बॅंकेत फत्तोमल पंजाबी यांचे 20 लाख रुपये होते. ते पैसे त्यांना काढता येत नव्हते. त्यामुळे ते तणावात होते. 24 तासांत ही पीएमसीच्या खातेदाराचा मृत्यू झाल्याची ही दूसरी घटना आहे. याआधी ओशिवारा येथील तारापोरेवाला गार्डन इथं राहणारे संजय गुलाटी यांचा मृत्यू झाला होता.

अमित शहांसोबत झालेल्या बैठकीवर सौरभ गांगुलीने केला पहिल्यांदाच खुलासा!

बँकेत अडकले 90 लाख रुपये

संजय गुलाटी यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याविरोधात सोमवारी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या परिवाराचे बँकेत तब्बल 90 लाख रुपये जमा होते. त्यांना आपल्या हक्काचा पैसा काढता येत नव्हता. बँकेच्या खातेदारांनी सोमवारी केलेल्या निदर्शनांमध्ये ते सहभागीही झाला होते. प्रदर्शनानंतर दुपारी साडेतीन वाजता ते घरी आले आणि झोपी गेले. सायंकाळी पावणेपाच वाजता जेवण करतेवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आधी गेली होती नोकरी. संजय गुलाटी हे जेट एअरवेजमध्ये नोकरीला होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली. आता त्यांना बचत केलाला पैसा बँकेत अडकला आहे. संजयला फक्त थायरॉइडची समस्या होती.

First published: October 16, 2019, 9:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading