राधेश्याम मोपलवारांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन कऱण्यात आलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2017 01:09 PM IST

राधेश्याम मोपलवारांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

21 आॅगस्ट : समृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

राधेश्याम मोपलवार यांची एमएसआरडीसीचे एमडी पदावरून हटवण्यात आलंय. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चौकशीची घोषणा केली होती. आता  मुख्यमंत्र्यांनी त्रिदसस्यीय समिती स्थापन केलीये.  माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन कऱण्यात आलीये. पोलीससह आयुक्त आणि डिसीपी इओडब्ल्यू यांच्या दोन सदस्यांचाही समितीत समावेश असणार आहे. राधेशाम मोपलवार यांच्यावर विधानसभेत झालेल्या आरोपाबाबत सखोल चौकशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...