मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

डोंबिवलीत मॅनहोलमध्ये गुदमरुन तिघांचा मृत्यू

डोंबिवलीत मॅनहोलमध्ये गुदमरुन तिघांचा मृत्यू

मेनहोल साफ करत असताना एक जण आत उतरला मात्र गॅसमुळे तो गुदमरला, त्याला वाचवायला दुसरा उतरला, तोही गुदमरला...

प्रदीप भणगे, प्रतिनिधी डोंबिवली, 26 आॅक्टोबर : डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात मॅनहोलमध्ये गुदमुरुन तीन मजुरांचा मृत्यू झालाय. तिघेही मॅनहोल साफ करणारे कंत्राटी कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. देविदास चंद्रभान पाजगे (३०), महादेव धोंडीराम झोपे (३८) आणि चंद्रभान अशी तिघांची नावं आहे. खंबाळपाडा परिसरात एमआयडीसीचं भुयारी गटार साफ करण्यासाठी हे तिन्ही कर्मचारी गेले होते. मॅनहोल साफ करत असताना एक जण आत उतरला मात्र गॅसमुळे तो गुदमरला, त्याला वाचवायला दुसरा उतरला, तोही गुदमरला, त्यामुळे या दोघांना वाचवायला तिसरा उतरला मात्र या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. या तिघांकडे कुठलेही सेफ्टी मास्क किंवा इतर सुरक्षात्मक यंत्रणा नव्हत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. =============================================
First published:

Tags: Dombivli, गटार, डोंबिवली, मेनहोल

पुढील बातम्या