रत्नागिरी, 20 डिसेंबर: रत्नागिरीजवळ मावळंगे गावाजवळ चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन मजूर ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेली माहिती अशी की, घरबांधणीसाठी लागणाऱ्या जांभा दगडांची वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मावळंगे गावाजवळ उलटला. ट्रकमध्ये भरलेल्या चिऱ्यांवर बसलेल्या तीन मजुरांचा दगडांखाली दबून जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने जखमीना बाहेर काढण्यात आले. अजय लाखण, सुधाकर लाखण, गोरक्षक काळे अशी मृतांची नावे आहेत.
11 महिन्यांत 12 हजार नागरिकांनी गमवला जीव
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 11 महिन्यांत 30 हजाराहून जास्त अपघात झाले आहेत. जवळपास 12 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी असला ही गंभीर बाब आहे.
नुकत्याच 20 च्या उंबरऱ्यावर आलेली अर्चना पारठे हिचा एका अपघातात मृत्यु झाला होता. या अपघाताल जबाबदार होता मद्यधुंद कारचालक. ही घटना मुंबईतील चुनाभट्टी परिसरात मागच्या आठवड्यात घडली होती. पण रोजच कुठल्या ना कुठल्या ठिकाणी असा हकनाक बळी जातोय.
महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर या काळात एकूण 30 हजार 80 अपघात झाले. मागच्याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये अपघाताचा आकडा 32 हजार 499 एवढा होता. तर यावर्षी 11 महिन्यांच्या काळात 11 हजार 387 लोकांचा मृत्यु झालाय. जे मागच्या वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी कमी आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत रस्त्यावर होणाऱ्या या अपघातांच प्रमाण हे 7 टक्क्यानी कमी असलं तरी हा आकडा आणखी कमी व्हावा, यासाठी परिवहन आयुक्तांनी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक टीम बनवली आहे. ही टीम अपघतानंतर त्या ठिकाणी पोहचून त्या जागेचे सर्वेक्षण करुन तिथली माहिती परिवहन आयुक्तालयाला कळवते. या टीमने केलेल्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की. रॅश ड्रायव्हिंगमुळे म्हणजेच बेदरकारपणे गाडी चालवल्याने सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक अपघात हे राज्य हायवेवर झाले आहेत. पण महत्त्वाची बाब म्हणजे या साडेचार महिन्यांच्या कालावधीत सगळ्यात कमी अपघात मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर झाले असले तरी त्यातील मृत्युदर हा 6 पट अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Konkan, Ratnagiri, Three Died, Truck accident