S M L

हावडा-मुंबई मेलचे 3 डबे रुळावरून घसरले

या अपघातामुळे मुंबई-दिल्लीसह उत्तर भारतात जाणारी-येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 10, 2018 09:12 AM IST

हावडा-मुंबई मेलचे 3 डबे रुळावरून घसरले

मनमाड, 10 जून : इगतपुरीजवळ 12809 अप हावडा-मुंबई मेलचे 3 डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे मुंबई-दिल्लीसह उत्तर भारतात जाणारी-येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्ददेखील या अपघातामुळे रद्द करण्यात आली.

काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या.

मनमाड येथून साहित्य आणि कामगारांना घेऊन ब्रेक डाऊन ही विशेष गाडी इगतपुरीकडे रवाना झाली होती.

रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी केली असून त्यावरून धीम्या गतीने काही गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र डाऊन लाईन अजून ही बंद असल्याने दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्याचा खोळंबा झाला आहे.

या अपघातानंतर असं असेल रेल्वेचं वेळापत्रक

Loading...

- मुंबई-पटना एलटीटीपाटली पुत्र एक्स्प्रेस आणि मुंबई-बनारस महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणे मार्गे सोडण्यात आल्या आहेत.

- मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला-गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

 

हेही वाचा...

VIDEO : पुरंदरमध्ये वादळ आलं, तलावातलं पाणी ढगात नेलं

नको ते धाडस!, पूल पार करताना 'तो' गेला वाहून

सलग तीन दिवस ड्युटी करुन घरी परतणाऱ्या एसटी चालकाचा मृत्यू

पत्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत जमीनदोस्त

नवी मुंबईत घरात शिरलं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2018 09:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close