• होम
  • व्हिडिओ
  • कल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय
  • कल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2018 03:23 PM IST | Updated On: Nov 1, 2018 04:34 PM IST

    कल्याण पूर्वेत आज दुपारी एक खळबळजनक घटना उघड झाली आहे. नेतिवली भागातल्या एका विहिरीत ३ खासगी कर्मचारी पडली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या लोकांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या फायरब्रिगेडच्या जवानांपैकी दोघांचा मृत्यू झालाय. प्रदीप भणगे या आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार या विहिरीत रसायनमिश्रित पाणी असल्याचा संशय स्थानिक व्यक्त करत आहेत. ही विहीर वापरात नव्हती, असं समजतं. या भागातील केमिकल कारखान्यांमुळे आलेलं दूषित केमिकलमिश्रित पाणी विहिरीत असावं आणि त्यानंच चौघांचा जीव घेतला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी