Elec-widget

धक्कादायक... 7 वर्षांच्या चिमुरडीवर 3 नराधम 8 महिन्यांपासून करत होते गॅंगरेप

धक्कादायक... 7 वर्षांच्या चिमुरडीवर 3 नराधम 8 महिन्यांपासून करत होते गॅंगरेप

धक्कादायक म्हणजे तिन्ही नराधम गेल्या 8 महिन्यांपासून हे कृत्य करत होते. शाळा सुटल्यानंतर नराधम पीडित चिमुरडीला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन नराधन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होते.

  • Share this:

मुंबई,23 सप्टेंबर: कल्याण शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 7 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 3 नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही नराधम गेल्या 8 महिन्यांपासून हे कृत्य करत होते. शाळा सुटल्यानंतर नराधम पीडित चिमुरडीला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन नराधन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होते.

घटनेला अशी फुटली वाचा...

पीडित चिमुरडी तिच्या चुलत बहीणीसोबत खेळत होती. खेळता खेळता पीडितेच्या वर्तवणुकीबाबत आजीला शंका आली. तिने मुलीला विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईनी ही बाब पीडितेच्या आई-वडिलांना सांगितली. नंतर थेट पोलिस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तिन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शाळा सुटल्यानंतर चिमुरडीवर बलात्कार करत होते आरोपी...

विक्रम पुरोहित (19), नवीन जसुजा (24) आणि अजय दोहारे (34) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसही सून्न झाले आहेत. चिमुरडीची शाळा सुटल्यानंतर तिचा ऑटो रिक्षा येण्यात 15 मिनिंटांचा कालावधी लागत होता. या दरम्यान तिन्ही आरोपी पीडितेला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार करत होते. रिक्षाचालक तिला परत नेण्यासाठी येण्यापूर्वीच ते तिला परत शाळेबाहेर आणून सोडत असल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही.

Loading...

कल्याण बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये पोक्सा कायद्यांतर्गत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना कल्याण सेशन कोर्टाने 24 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2019 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...