Home /News /mumbai /

लॉकडाऊनमध्ये सोडावी लागली शाळा अन् दुकानात केलं काम, अखेर चिमुरड्याला मिळाली मदत

लॉकडाऊनमध्ये सोडावी लागली शाळा अन् दुकानात केलं काम, अखेर चिमुरड्याला मिळाली मदत

त्याच्या वडिलांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्यानंतर त्याच्या आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. त्याच्या घरी त्याची आई एकटीच कमवती आहे. लॉकडाऊनमध्ये आईची नोकरी गेली, लॉकडाऊनच्या एका महिन्यातच जवळचे पैसे संपले.

    मुंबई, 14 नोव्हेंबर : कोरोना काळात परिस्थितीमुळे शाळा सोडण्यास भाग पडलेल्या मुंबईच्या एका लहानग्याच्या मदतीसाठी आता हजारो हात पुढे आले आहेत. या शाळकरी विद्यार्थ्याची परिस्थिती सोशल मीडिया पेज 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ने शेअर केली होती. त्यानंतर लोकांनी या 14 वर्षीय विद्यार्थ्यांची स्टोरी सोशल मीडियावर पाहिल्यानंतर, अनेक जण या मुलासाठी पुढे सरसावले आहेत. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या 14 वर्षीय मुलाने सांगितलं की, त्याच्या वडिलांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्यानंतर त्याच्या आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. त्याच्या घरी त्याची आई एकटीच कमवती आहे. जितका पैसा कमावला जातो, तितका त्याची आई, त्याच्यावर आणि त्याच्या बहिणींवर खर्च करते. आई रोज काम करते, एकही दिवस सुट्टी घेत नाही, माझ्या आईला आमची सर्व स्वप्न पूर्ण करायची असल्याचं, त्याने सांगितलं. 'आमची आई आमच्या शिक्षणाबाबत अतिशय कडक आहे. एकदा एका परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यावेळी आईने, केवळ शिक्षणचं तुला एक चांगलं भविष्य देऊ शकतं, असं सांगितलं. ती गोष्ट माझ्या कायम लक्षात आहे. मी पायलट व्हावं अशी आईची इच्छा आहे. आईच्या डोळ्यातील माझ्याविषयीचं स्वप्नचं आता माझं स्वप्न झाल्याचं' तो म्हणाला. 'माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेत असून माझे गुणही आता चांगले येत असल्याचं' त्याने सांगितलं. परंतु दुर्देवाने, 'कोरोना काळात इतर हजारो लोकांप्रमाणेच आमच्याही कुटुंबालाही मोठं नुकसान झालं आहे. लॉकडाऊनमध्ये माझ्या आईची नोकरी गेली, लॉकडाऊनच्या एका महिन्यातच आमच्या जवळचे पैसे संपल्याचं', त्याने सांगितलं. त्यानंतर या मुलाने एका किराणा दुकानात काम करण्यास सुरूवात केली. या दुकानात त्याला रोज 100 रुपये मिळतात. मोठी स्वप्न घेऊन शाळेत चांगले गुण मिळवणाऱ्या या 14 वर्षीय मुलाला त्याच्या परिस्थितीमुळे आपलं शिक्षण सोडावं लागलं. मात्र आता सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर, त्याला अनेकांकडून मदतीचे हात पुढे आले आहेत.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Corona virus in india, Lockdown, Mumbai

    पुढील बातम्या