यंदा म्हाडाच्या लॉटरीत 9206 घरं, 'ही' आहे ठिकाणांची यादी

यंदा म्हाडाच्या लॉटरीत 9206 घरं, 'ही' आहे ठिकाणांची यादी

यंदाच्या म्हाडाच्या 9206 घरांची लॉटरी निघणार आहे. यामध्ये खाजगी विकासकाने बांधलेल्या सुमारे 1800 घरांचा समावेश करण्यात आला आहे

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : मुंबईसह उपनगरात हक्काचे घरं असावं असं प्रत्येक जण स्वप्न पाहतो. पण गगनाला भिडलेल्या जमिनीच्या भावामुळे मोठी किंमत मोजावी लागतेय. त्यामुळेच सर्वसामन्यांचे अवाक्यात घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने खासगी विकासकांच्या घरांचाही समावेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये म्हाडाचे घर तर घेता येईलच सोबतच मोठ्या बिल्डरांनी बांधलेल्या इमारतीमध्ये घर घेण्याची संधी चालून आली आहे.

यंदाच्या चालू वर्षात म्हाडाच्या 9206 घरांची लॉटरी निघणार आहे. यामध्ये खाजगी विकासकाने बांधलेल्या सुमारे 1800 घरांचा समावेश करण्यात आला आहे.  मुंबईच्या कोकण बोर्डाची 9206 घरांची जाहिरात 10 फेब्रुवारीपर्यंत निघणार आहे. यावेळी कल्याण, ठाणे, डोंबिवली परिसरात मोठ्या संख्येनं ही घरं आहेत.

विशेष म्हणजे, यात मोठी घरं नाहीत म्हणजेच मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी एकही घर नाही. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांना सगळ्यात जास्त घरं म्हणजे 7875 इतकी घरं आहेत तर 1286 घरं ही अल्प उत्पन्न गटासाठी 1286 घरं आहेत. लॉटरीसाठी अर्जाची किंमत ही 560 रुपये असेल. ज्यात 500 रुपये अर्जाची किंमत तर 60 रुपये जीएसटी आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 5000 तर अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार रुपये इतकी अनामत रक्कमेचा भरणा करावा लागेल. घरासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे हे जाहिरातीनंतर तुम्ही ठरवता येईल. पण त्याआधी आम्ही

तुम्हाला कुठं आणि कोणत्या ठिकाणी घरं घेता येईल? याची माहिती पुढील प्रमाणे...

कल्याण- शिरढोण : 2713 घरं

कल्याण-खोणी : 2507 घरं

भंडार्ली-(शीळफाटा -पनवेल रोड) : 1859 घरं

डोंबिवली : 1643 घरं

अंजुर भिवंडी- : 289

नवी मुंबई : 40

ठाणे(कावेसर कासारवडवली : 122 घरं

वाळीव, वसई : 43 घरं

यातील सुमारे 1800 घरे ही खाजगी विकासकाने म्हाडाला सोपवलेली घरे आहेत. म्हाडाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या सदानिकांपैकी 20 टक्के घरं ही विकासकाला म्हाडाकडे सोपवणे बंधनकारक आहेत. त्यापैकी ही घरे असणार आहेत.

उत्पन्न गट कसा असेल

अत्यल्प उत्पन्न गट- ज्यांचं मासिक उत्पन्न 25 हजारापर्यंत असेल अशा व्यक्तींचा अत्यल्प उत्पन्न गटात समावेश

अल्प उत्पन्न गट - ज्यांचं मासिक उत्पन्न 25 हजार ते 50 हजार इतकं असेल त्यांचा समावेश अल्प म्हणजे एलआयजी या उत्पन्न गटात होतो.

फेब्रुवारीमध्ये जाहिरात आल्यानंतर ऑनलाइन अर्ज साधारण 23 फेब्रुवारीपासून भरण्यास सुरवात होईल तर जाहिरातीनंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरीची सोडत काढली जाईल आणि कुणाचं घराचं स्वप्न पूर्ण झालं हे कळेल.

 

First published: January 29, 2020, 7:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading