मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ही आहे जगातील सर्वात कठीण परीक्षा; डोळेबंद करुन ओळखावा लागतो दारुचा प्रकार आणि निर्मितीचे ठिकाण

ही आहे जगातील सर्वात कठीण परीक्षा; डोळेबंद करुन ओळखावा लागतो दारुचा प्रकार आणि निर्मितीचे ठिकाण

ही आहे जगातील सर्वात कठीण परीक्षा; डोळे बंद करुन ओळखावा लागतो दारुचा प्रकार आणि निर्मितीचे ठिकाण

ही आहे जगातील सर्वात कठीण परीक्षा; डोळे बंद करुन ओळखावा लागतो दारुचा प्रकार आणि निर्मितीचे ठिकाण

चौथ्या टप्प्यात परीक्षार्थीला मद्याचा किंवा दारुचा वास घेऊन ती कोणत्या भागातील आहे आणि तिची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली आहे, हे ओळखण्यास सांगितलं जातं.

नवी दिल्ली, 29 मार्च : परीक्षांचा कालावधी संपून आता निकालाचा हंगाम सुरु झाला आहे. दुर्गम भागातील विद्यार्थी कोणत्याही स्वरुपाच्या सुविधा नसतानाही परीक्षेत टॉप करताना दिसतात. या सर्व पार्श्वभूमीवर जगातील सर्वात अवघड परीक्षेविषयी थोडी माहिती घेऊया. तसं पाहिला गेलं तर जगभरात एकापेक्षा एक अवघड परीक्षा घेतल्या जातात. परंतु मास्टर सोमौलिअर डिप्लोमा परीक्षा (Master Sommelier Diploma EXam)या श्रेणीतील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. ही परीक्षा चार टप्प्यात होते. चौथ्या टप्प्यात परीक्षार्थीला मद्याचा किंवा दारुचा वास घेऊन ती कोणत्या भागातील आहे आणि तिची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली आहे, हे ओळखण्यास सांगितलं जातं. मात्र या परीक्षेला बसलेले सारेच उमेदवार अपयशी ठरतात.

केव्हा सुरु झाली ही परीक्षा

1977 मध्ये मद्यप्रेमींनी एकत्र येत एका संस्थेची स्थापना केली. त्याला कोर्ट ऑफ मास्टर सोमौलियर (Court Of Master Sommelier)असे नाव देण्यात आले. मद्यप्रेमींना दारु देणाऱ्यांनी असे मिश्रण बनवून ती द्यावी की त्याची मजा वाढली पाहिजे,हा या संस्थेचा उद्देश होता. यामध्ये कोणत्या मद्यासोबत कोणते खाद्यपदार्थ अधिक चांगले असतात,याबाबतच्या प्रशिक्षणाचाही समावेश होता. मात्र यापूर्वी लंडनमध्ये 1969 मध्ये मास्टर सोमौलिअर परीक्षा झालेली होती. त्यानंतर यालाच संस्थेचं रुप देत अधिक चांगल्या पध्दतीनं ही परीक्षा घेतली जाऊ लागली.

सोमैलिअर म्हणजे काय?

ही वाईन व्यवसायिकांना दिली गेलेली संज्ञा आहे. अनेक उच्चभ्रू हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये हे वाईन व्यावसायिक असतात. ते ग्राहकांना मद्याचे किंवा दारुचे उत्कृष्ट मिश्रण तयार करुन देतात.तसेच वाईन किंवा दारुसोबत कोणते पदार्थ खाण्यायोग्य असतील याबाबतही त्यांना माहिती असते. याला वाईन अ‍ॅण्ड फूड पेअरिंग म्हणतात. सोमौलिअरची श्रेणी ही क्षुल्लक नसते,तर ती स्टार्स हॉटेल्समध्ये शेफ जे कझिन किंवा ग्रॅण्ड शेफच्या समकक्ष असते. खरंतर थोडेफार ट्रेनिंग देऊन अनेक हॉटेल्समध्ये वाईन व्यवसायिकांची भरती केली जाते. परंतु,खरंतर यासाठी एक विशेष परीक्षा असते. ही परीक्षा जगभरातील अन्य परीक्षांच्या तुलनेत खूपच कठीण मानली जाते. ही परीक्षा पास होणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे,

परीक्षा कशी होते

ही परीक्षा चार टप्प्यात होते. पहिला टप्पा परिचय टप्पा (Introductory Stage)म्हणून ओळखला जातो. ज्यांना रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा थोडाफार अनुभव आहे अशी कोणतिही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. यासाठी परीक्षेपूर्वी एक ते दोन दिवस अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच्या टप्प्यात बहुपर्याय परीक्षा घेतली जाते. यात मद्यनिर्मिती,द्राक्ष आणि सफरचंदाचे वाण,मद्य आणि त्यासोबत सेवन केले जाणारे अन्न याबाबत प्रश्न विचारले जातात. या टप्प्यात उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारास इंट्रोडक्टरी सोमौलिअर समजले जाते.

असा असतो दुसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्यात सर्टिफाईड सोमौलिअरसाठी (Certified Sommelier)परीक्षा घेतली जाते. हा टप्पा पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरलेल्यांसाठी आणि अॅडव्हान्स टप्प्यात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तयार असलेल्याकरिता असतो. या परीक्षेचे अनेक भाग असतात. या परीक्षेत लिखाणासोबतच डोळ्यांवर पट्टी बांधून मद्याचा वास घेत त्याची चव ओळखणे,त्याची निर्मिती कधी झाली आहे,कोणत्या द्राक्ष वाणापासून ते मद्य बनवले आहे,त्याचा रंग कसा आहे आदी गोष्टी सांगाव्या लागतात. यात चार प्रकारच्या वाईनची ब्लाईंड टेस्ट (Blind test)घेतली जाते. या टप्प्यात जे यशस्वी होतात,त्यांना सर्टिफाईड सोमौलिअर संबोधले जाते. या परीक्षेत 66 टक्के लोक यशस्वी होतात.

अॅडव्हान्स सोमौलिअर हा एक टप्पा आहे

पहिल्या दोन टप्प्यात यशस्वी झालेल्या व्यक्ती यात येतात. अमेरिकेत वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते. युरोपमध्ये ही परीक्षा 5 दिवस चालते. यात लेखी परीक्षा असते,त्यात 60 प्रश्नांचा समावेश असतो. त्यानंतर वाईन टेस्टींग घेतली जाते.यात डोळ्याला पट्टी बांधून 25 मिनिटांत 6 प्रकारच्या वाईन किंवा मद्याची विविध वैशिष्ठे सांगावी लागतात.

शेवटी होते मास्टर सोमौलिअर परीक्षा

पहिल्या तीन टप्प्यात यशस्वी झालेल्या आणि हॉटेल इंडस्ट्रीचा किमान 10 वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्ती या टप्प्यात सहभागी होऊ शकतात. या परीक्षेला बसण्यासाठी परीक्षार्थींना अर्ज करण्याची गरज नसते कारण परीक्षार्थींचे वरिष्ठ यासाठी नावे सुचवतात. त्यानंतरच ही परीक्षा देता येते.

मद्य किंवा वाईनचे तत्वज्ञान काय आहे

जगभरात वाईन,कॉकटेल विषयी (WIne And Cocktail)सर्वजण बोलतात. यावेळी दारुच्या तत्वज्ञानाविषयी देखील प्रश्न उपस्थित केले जातात. ही परीक्षा एवढी कठीण मानले जाते की ती वेगवेगळ्या टप्प्यात तीन वर्षांपर्यंत चालते. डझनभर वेळा ही परीक्षा देतात. पूर्ण आयुष्य जातं तरी कित्येक जण या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. आतापर्यंत केवळ 9 जण पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास झाले आहेत.

First published:

Tags: Exam, Liquor stock