Home /News /mumbai /

....हा तर निव्वळ बालिशपणा, उदय सामंतांनी निलेश राणेंना फटकारलं

....हा तर निव्वळ बालिशपणा, उदय सामंतांनी निलेश राणेंना फटकारलं

200 लोकांच्या समोर ही गुप्त बैठक कशी असेल. मुळात ही गुप्त बैठक झाल्याचं कोण सांगत आहे, ज्यांना कोकणातील लोकांनी 2 वेळा नाकारलं.

    मुंबई, 25 मे: माझी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची गुप्त भेट झाल्याचं कोणी सांगितलं. ज्यांना कोकणांनी 2 वेळा नाकारला. उगाच ट्वीट करून वाटेल ते आरोप करणे हा निव्वळ बालिशपणा आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते आणि उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी भाजपचे नेते निलेश राणेंना (Nilesh Rane) फटकारून काढले. उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, निलेश राणेंचा साधा उल्लेखही न करता उदय सामंत यांनी टीका केली. 'मला जर गुप्त बैठक करायची असेल तर मी रत्नागिरीच्या मतदारसंघात का करेल. मी जर नागपूरला जाऊन भेटलो, दिल्लीला जाऊन भेटलो तर ती गुप्त बैठक म्हणता येईल. 200 लोकांच्या समोर ही गुप्त बैठक कशी असेल.  मुळात ही गुप्त बैठक झाल्याचं कोण सांगत आहे, ज्यांना कोकणातील लोकांनी 2 वेळा नाकारलं. त्यांनी माझं राजकीय अस्तित्व हलवण्याची हे बोलणं योग्य नाही, असा सणसणीत टोला उदय सामंत यांनी निलेश राणे यांचं नाव न घेता लगावला. या घटनेमुळे मुरली कार्तिकच्या पत्नीला स्टेडियममधून पळ काढावा लागला होता 'त्यांच्या कोणत्याही आरोपावर मी बोलत ना,ही दाखल घेत नाही. असे ट्विट करून माझा पक्षाप्रमुखांबाबत विश्वास असेल तर तो हटणार नाही. मुळात ही घटना 6 दिवसांपूर्वीची आहे. मी त्यावेळी रत्नागिरीला होतो. देवेंद्र फडणवीस हे तिथे आले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे विरोधकांचा स्वागत करण्याची पद्धत आजही आहे.  माझ्या मतदारासंघात आले होते म्हणून त्यांची भेट घेणे चुकीचं नाही, हे मी समजतो. पण आरोप करणारे पण समोर बसलेले होते, ते कुठे बसलेले ते मी सांगत नाही त्याठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी होते. भाजप पदाधिकारी पण होते, म्हणजे काय ते काय शिवसेनेत आले असा समज होत नाही' असा टोलाही सामंत यांनी लगावला. 'राज्यात ऑपरेशन लोट्सची गरज नाही. भविष्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला म्हणून शरद पवार यांच्याशी संबंध तुटले असं नाही. महाविकास आघाडीत तितकाच आदर आम्ही एकमेकांशी करतो' असंही सामंत म्हणाले. कोरोना संपावा याकरता भाजप आमदारानं केलं होमहवन, शहरात फिरवला होमयज्ञ! पाहा VIDEO 'जे असे काही आरोप करतात ते राजकीय वातावरण बिघडवत आहे, आरोप आणि दावा कोण करतो यात अवलंबून असतं. महाराष्ट्र अस्थिर कारण होणार नाही. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मला सन्मान आहे. विरोधक म्हणून जो मानसन्मान त्यांना मिळाला कदाचित तो त्यांना पक्षातही मिळत नाही, म्हणून हा पोटशुळ उठला असेल, मुळात  त्यांचं फार मोठं वजन आहे ते त्यांच्या 2 निवडणुकीतून त्यांना कळलं आहे. ट्विट कोणी कधी करावं, असा टोलाही सामंत यांनी लगावला. 'शिवसेनेने मला मानसन्मान मिळतो उद्धव जी मला कुटुंबाप्रमाणे वागवतात मला दुसरीकडे बघायची गरज नाही. कोणाला कुठे बसायचा मानसन्मान मिळाला नाही हे त्यांनी विचार करावा. शिवसेना पक्ष आणि शिवसैनिक यांच्या जोरावर मी काम करतो. शिवसेना शाखाप्रमुख पण तिकडे जाणार नाही हे मी सांगतो. 2004 ला शिवसेनेत आलो तेव्हापासून मी काम करतोय, भाजपची मतं मला पटत नाही, असंही सामंत म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या