मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'पदवीधर निवडणुकीत पचकाच केला', शिवसेनेचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

'पदवीधर निवडणुकीत पचकाच केला', शिवसेनेचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

'राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राची मन की बात आहे. पाचपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली.

'राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राची मन की बात आहे. पाचपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली.

'राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राची मन की बात आहे. पाचपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 04 फेब्रुवारी : 'पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजपची मक्तेदारी राहिलेली नाही व विधान परिषद निवडणुकीचे ताजे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक आहे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला. पुन्हा उपमुख्यमंत्री फडणवीसांचे राजकीय वर्चस्व. तरीही भाजप पराभूत होतो. हाती सत्ता, पोलीस, पैशाचे बळ असूनही पदवीधर-शिक्षक बधले नाहीत व त्यांनी भाजपचा पचकाच केला. पदवीधर-शिक्षकांनी दिलेला हा कौल म्हणजे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे. आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचे आहेत. ही तर सुरुवात आहे' असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

    'पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजीने मारली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर चांगलेच तोंडसुख घेण्यात आले आहे.

    (कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीची बैठक, चर्चेनंतर काय ठरलं?)

    'राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राची मन की बात आहे. पाचपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली. भाजपचा व त्यांच्या मिंधे गटाचा सपशेल पराभव झाला. फडणवीस-मिंधे सरकारच्या खोटारडेपणास ब्रेक लागणारे हे निकाल आहेत. कोकण मतदारसंघात (शिक्षक) भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करून निवडून आले. बाळाराम पाटील हे शे. का. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीत उभे होते. पण महाराष्ट्र विकास आघाडीने त्यांना पाठबळ दिले. तरीही कोकणातील शिक्षक मतदारांनी यावेळी वेगळा निकाल दिला. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-मिंधे गटाची पिछेहाट होत असताना कोकणात हा एकमेव विजय त्यांना मिळाला. यात भाजपपेक्षा शिक्षक उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कर्तृत्व जास्त. म्हात्रे हे काही मूळचे भाजपचे नाहीत. भाजपास ‘रेडीमेड’ उमेदवार हाती लागले. योगायोगाने ते जिंकले इतकेच. कोकणातील शिक्षक मतदारसंघातील विजय हा शिवसेनेस धक्का वगैरे असल्याची आवई उठवली जात आहे. तो शुद्ध मूर्खपणा आहे. महाराष्ट्रातील इतर चार जागांवर भाजपच्या हाती भोपळा लागला. त्यावर जरा बोला, असा टोला सेनेनं भाजपला लगावला.

    सगळ्यात जास्त वादात व गर्जत राहिली ती नाशिक पदवीधरांची निवडणूक. येथे काँग्रेसचे जुनेजाणते उमेदवार सुधीर तांबे यांनी घोळात घोळ घातला व ऐन वेळेस माघार घेऊन सत्यजीत तांबे या आपल्या चिरंजीवास अपक्ष म्हणून

    अर्ज भरायला लावला. पिता की पुत्र हे आधीच ठरवायला हवे होते. मतदारसंघात तांबे व काँग्रेसने मतदारांची नोंदणी केली व कोणत्याही परिस्थितीत तांबे हेच जिंकणार होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीत हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वास हा नगरचा तिढा शांत डोक्याने व सन्मानाने सोडवता आला असता. झाकली मूठ तशीच ठेवून सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार असा पवित्रा घेता आला असता. पण तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय? असा डाव कदाचित असावा. त्यात किती तथ्य ते त्यांनाच माहीत, असा संशयच सेनेनं वर्तवला.

    (कसबा पोटनिवणुकीत भाजपकडून तिकीट कुणाला? सस्पेन्स वाढला)

    भाजपच्या उधार-उसनवारीच्या राजकारणाची. कोकण शिक्षक मतदारसंघात त्यांच्याकडे स्वतःचा उमेदवार नव्हता. तेथे उधारीवर निवडणूक लढवली व नाशिक पदवीधर मतदारसंघातही भाजपला स्वतःचा उमेदवार मिळाला नाही. दुसऱ्यांवर दरोडे टाकूनच त्यांचे राजकारण सुरू असते. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातही भाजपने किरण पाटील हा उमेदवार आयत्या वेळेस उधारीवरच घेतला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे येथे चौथ्यांदा विजयी झाले. अशा तऱ्हेने मराठवाडय़ातील शिक्षक-पदवीधरांनी भाजपला नाकारले आहे, असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.

    'अमरावती मतदारसंघात भाजपचे रणजीत पाटील हे सतत दोन वेळा निवडून आले. फडणवीस यांचे ते खासमखास व मागच्या फडणवीस मंत्रिमंडळात ते मंत्री होते. पाटलांना विजयाची 1000 टक्के ‘गॅरंटी’ होती, पण अमरावतीच्या पदवीधरांनी त्यांना घाम फोडला व शेवटी घरीच बसवले. काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांना विजयी केले. हा व्यक्तिशः फडणवीस यांना धक्का आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत विद्यमान आमदार गाणार यांचा पराभव महाविकास आघाडीच्या सुधाकर अडबाले यांनी केला. याचा अर्थ विदर्भातील सुशिक्षित मतदार आता शहाणा झाला असून भाजपच्या थापेबाजीच्या भूलभुलैयास बळी पडत नाही, याआधी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव करून काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झालेच आहेत व आता शिक्षक मतदारसंघही हातचा गेला, असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.

    First published: