मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'ही तर टाईमपास टोळी', आदित्य ठाकरेंनी मनसेच्या नेत्याला सुनावले

'ही तर टाईमपास टोळी', आदित्य ठाकरेंनी मनसेच्या नेत्याला सुनावले'पक्ष आहे की संघटना आहे, हे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे...

'पक्ष आहे की संघटना आहे, हे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे...

'पक्ष आहे की संघटना आहे, हे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे...

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 04 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेत वाक्य युद्ध पेटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला विरप्पन टोळी म्हणून टीका केली होती. त्यावर सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख करत सणसणीत टोला लगावला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील चेंबूर येथील भक्ती पार्कमध्ये मियावाकी बागेची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मनसेची चांगलीच खिल्ली उडवली.

'पक्ष आहे की संघटना आहे, हे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपण का लक्ष दिले पाहिजे, ही तर निव्वळ टाईमपास टोळी आहे' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सणसणीत ठाकरी टोला लगावला.

'देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला कर कमी करावा त्यामुळे  पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील असा सल्ला दिला होता, याबद्दल पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी जो राज्य सरकारला सल्ला दिला आहे तो त्यांनी केंद्र सरकारला द्यावा' असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

'मुंबईतील विकासकामांचा मी पाहणी दौरा करत असतो. मानखूर्द फ्लायओव्हरचे काम जून महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मियावाकी जंगलांच्या प्रकल्पात आत्ता 56 हजार झाडे आहेत. याच ठिकाणी 1 लाख झाडे जगवण्याचं उद्दीष्ट आहे', अशी माहितीही आदित्य ठाकरेंनी दिली.

'मुंबईत विकासकामं करताना 16 प्लानिंग एजन्सी आहेत. अनेक एजन्सी असल्या की, एक काम करताना अनेक वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यापेक्षा एक एजन्सी असणं गरजेचं आहे', असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

'मी जो दिल्लीच्या सीमेवरचा फोटो बघितला तो बघून मला वाटलं की चायना बॉर्डर आहे का? पण, ही शेतकऱ्यांना अडवण्यासाठीची तयारी होती. जगभरातून किंवा आपल्या देशातून कोणीही ट्वीट केलं तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत का बोलत नाही.' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला टोला लगावला.

First published: