Home /News /mumbai /

'हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतिक', अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसची टीका

'हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतिक', अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसची टीका

जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंग व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे.

    मुंबई, 11 मे: 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडाली आहे. 'हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे' अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे. सीबीआय पाठोपाठ ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, तसंच राजकीय सूडबुद्धी ही आहे, अशी टीका सावंत यांनी केली. तसंच, परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने 100 कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंग यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? असा सवाल सावंत यांनी विचारला आहे. खूशखबर! अक्षय तृतीयेला खरेदी करा स्वस्त सोनं, आजही सोन्याचांदीच्या दरात घसरण तसंच,  जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंग व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला. तर, अनिल देशमुख यांच्यावर राजकीय हेतुने कारवाई करण्यात आली आहे. राजकीय सुडबुद्धीने ईडीकडून ही कारवाई केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या