मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /थर्टी फर्स्टला पार्ट्यांना रात्री 12 वाजेपर्यंत असणार परवानगी, पोलिसांकडून नियमावली जाहीर

थर्टी फर्स्टला पार्ट्यांना रात्री 12 वाजेपर्यंत असणार परवानगी, पोलिसांकडून नियमावली जाहीर

 मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश जारी केला आहे.

मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश जारी केला आहे.

मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश जारी केला आहे.

मुंबई, 15 डिसेंबर : सरत्या वर्षाला (new year celebration) निरोप देण्यासाठी आता काही दिवस उरले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे (31st party 2021) आयोजन केले जात आहे. पण, कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (omicron) वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसंच, पार्टी आयोजकांना 12 वाजेपर्यंत परवानगी असणार अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश जारी केला आहे. 16 ते 31 डिसेंबरपर्यंत मुंबईत निर्बंध असणार आहे.  उद्या दिनांक 16 डिसेंबरपासून ते 31 तारखेपर्यंत मुंबईत कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे मोकळ्या ठिकाणी पार्टी करण्यास मज्जाव असणार आहे.  तसंच, लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच हॉटेलमध्ये पार्टीला एन्ट्री असणार आहे. ५० टक्के क्षमतेने हॉटेल बार सुरू राहतील. यासाठी  पूर्ण हॉटेल स्टाफचे लसीकरण आवश्यक असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री १२ पर्यंतच परवानगी असणार आहे. त्यामुळे हॉटेल, पब हे 12 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यासाठी परवानगी असण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर जर एखाद्या ग्रुपला पार्टीचे आयोजन करायचे असेल तर पार्टीला येणाऱ्या सर्व व्यक्तींनी कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेले असणे गरजेचं बंधनकारक आहे.

दुकान, अत्यावश्यक सेवेची दुकानं, मॉल, इव्हेंटसाठी येणाऱ्या व्यक्तींना लसीकरणाचे दोन डोस बंधनकारक असणार आहे.अशाच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.  या काळात वाहन चालकांनी सुद्धा लशीचे दोन डोस घेतलेली असावी.

राज्यभरात जर प्रवास करणार असाल तर एकतर तुम्ही लशीचे दोन डोस घेतलेले असावे अथवा 72 तासांपूर्वीच RT - PCR चाचणी केलेली असणे बंधनकारक असणार आहे.

थर्टीफस्टसाठी आयोजित करणाऱ्या येणाऱ्या कार्यक्रम, पार्ट्यांसाठी हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी 50 टक्के लोकांची उपस्थिती असणार आहे. असा कार्यक्रम आयोजित करण्याआधीच याची माहिती प्रशासनाला कळवावी लागणार आहे.

First published:
top videos