बोरिवलीत चोरांचा उच्छाद, 3 दिवसांमध्ये 15 दुकानं फोडली

बोरिवलीत चोरांचा उच्छाद, 3 दिवसांमध्ये 15 दुकानं फोडली

सलग तीन दिवसांमध्ये बोरिवलीत तब्बल 15 दुकांनांमध्ये चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

  • Share this:

सत्यम सिंग, प्रतिनिधी

बोरिवली, 29 नोव्हेंबर : सलग तीन दिवसांमध्ये बोरिवलीत तब्बल 15 दुकांनांमध्ये चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्यादेखील आवळल्या आहेत.

सीसीटीव्हीत फुटेजमध्ये दिसणाऱ्या या चोरट्यांनी एक-दोन नव्हे तर, तब्बल 15 दुकानांमधल्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोरिवलीच्या आयसी कॉलनी परिसरात सुपर मार्केट आणि अनेक दुकाने आहेत. सलग तीन रात्रीत चोरट्यांनी १५ दुकाने फोडून अडीच ते तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

एकापाठोपाठ तीन दिवस तक्रारी आल्याने पोलीसही सतर्क झाले होते. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनेची माहिती घेऊन तांत्रिक धागेदोऱ्याच्या आधारावर तपास करून गुन्हयातील आरोपीना नालासोपारा,विरार, या परिसरातून ३ आरोपींना अटक केली आहे.  कधी दुचाकीवरून येऊन कारमधल्या बॅगा घेऊन पळून जायचे तर, कधी रात्री दुकानात शिरून दुकानातील ऐवजावर डल्ला मारायचे.

अशा या सराईत चोरट्यांनी बोरिवलीत धुमाकूळ माजवला होता.अखेर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 11:24 PM IST

ताज्या बातम्या