मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आमदारकीसाठी राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच, या महिला पदाधिकारी आहेत स्पर्धेत

आमदारकीसाठी राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच, या महिला पदाधिकारी आहेत स्पर्धेत

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी यांच्यात चांगलीच चुरस रंगली आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी यांच्यात चांगलीच चुरस रंगली आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी यांच्यात चांगलीच चुरस रंगली आहे.

मुंबई, 6 जून : राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी यांच्यात चांगलीच चुरस रंगली आहे. विधानपरिषद उमेदवारी मिळावी म्हणून अनेक महिला पदाधिकारी इच्छुक आहे. राज्यपाल नियुक्त 10 जागा रिक्त झाल्या आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी एक जागा महिला प्रतिनिधींना मिळेल हे निश्चित मानलं जातं आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहेत. विद्यमान विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण या दोन वेळा परिषदेवर आहेत. अभ्यासू आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गटाच्या मान्यल्या जातात. तर रुपाली चाकणकर यांची पुणे महिला जिल्हाध्यक्ष पदावरून थेट महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष निवड झाली. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. पक्षाच्या दोन वेळा प्रदेशाअध्यक्ष असलेल्या ग्रामीण अभ्यासू चेहरा सुरेखा ठाकरे आहेत. त्या 2 वेळा अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. तसंच महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे या देखील स्पर्धेत आहेत. त्यांनी राष्ट्रीय डेअरी बोर्ड, पुणे महिला अध्यक्षची जबाबदारी सांभाळली आहे. वैशाली नागवडे सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन्ही गटात काम करतात. राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा सलक्षा सलगर यांचंही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. एक कणखर वक्ता म्हणून त्या सर्वपरिचित आहेत. तसंच युवती संघटन बांधण्याचं कौशल्य असून सुप्रिया सुळे यांच्या गटात स्थान आहे. तर नुकतीच ज्यांना विधानपरिषदेवर उमेदवारी देण्यात आली पण नियुक्ती झाली नाही अशा अदिती नलावडेही स्पर्धेत आहेत. प्रदेश कार्यालय जबादारी सांभाळणे , मुंबईत युवती अध्यक्ष , समन्वय याबरोबर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील गटाचा देखील पाठिंबा मिळू शकतो. दरम्यान, आपल्या गटातील सदस्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असला तरी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: NCP, Sharad pawar

पुढील बातम्या