Maharashtra Lockdown : 'हे निर्णय त्वरित घ्यावेत', फडणवीसांची लॉकडाऊनवर पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Lockdown : 'हे निर्णय त्वरित घ्यावेत', फडणवीसांची लॉकडाऊनवर पहिली प्रतिक्रिया

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 'वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या ' अशी मागणी

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्या आहेत.

'लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसीवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने Engagement केली? अभिनेत्रीने शेअर केला PHOTO

'कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

IPL 2021 : 7 ओव्हर 39 रन आणि 5 विकेट, अशी गडगडली मुंबईची बॅटिंग

'मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण, बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

त्याचबरोबर, 'वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: April 13, 2021, 10:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या