Home /News /mumbai /

Cyclone Alert: मुंबईवर चक्रीवादळाचं नवं संकट, समुद्रात मोठ्या हालचाली

Cyclone Alert: मुंबईवर चक्रीवादळाचं नवं संकट, समुद्रात मोठ्या हालचाली

Cyclone Alert in Mumbai

Cyclone Alert in Mumbai

महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर (Cyclone Alert in Mumbai) चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. मुंबईत कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

    मुंबई, 7 मार्च: महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर (Cyclone Alert in Mumbai) चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. मुंबईत कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. अनेक जण घरातच राहण्यास पसंती देत आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच, समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचं संकट गडद होणार आहे, असे अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर 2050 पर्यंत ही पातळीत झालेल्या वाढीमुळे सुमारे पाच हजार कोटी इतके नुकसान होईल, अशी भीती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या दुसऱ्या भागात व्यक्त करण्यात आली. 2070 पर्यंत यात 2.9 पटीने वाढ होईल, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. पळून जाऊन बहिणीशी लग्न केल्यानं घेतला सिनेस्टाईल बदला,नालासोपाऱ्यातील थरारक घटना  मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात असले तरी भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीला धोका पोहचू शकतो. दुसरीकडे मुंबईलगत जागतिक तापमानवाढीसह समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळांत वाढ होईल, अशीही भीती वर्तविण्यात आली आहे. भविष्यात मुंबईला चक्रीवादळाचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवणार असून, मान्सूनपूर्व आणि नंतर दोन्ही चक्रीवादळात वाढ होईल. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा मोठा धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जर उत्सर्जन वेगाने कमी केले नाही तर जागतिक पातळीवर उष्णता आणि आर्द्रता लवकरच धोक्याची पातळी ओलांडू शकतात. ग्लोबल वार्मिगमुळे पृथ्विचे कालचक्रच बदलण्याची भीती संशोधक व्यक्त करत आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Cyclone, Mumbai, Weather forecast, Weather update

    पुढील बातम्या