• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • NCB RAID : 3 दिवस चालणार होती क्रुझवर ड्रग्स पार्टी, NCB ने अशी केली कारवाई

NCB RAID : 3 दिवस चालणार होती क्रुझवर ड्रग्स पार्टी, NCB ने अशी केली कारवाई

या क्रुझवर जवळपास 1500 लोक होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑक्टोबर : मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ( CRUISE SHIP) सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला आहे. या क्रुझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. हे क्रुझ गोव्याला (goa) निघाले होते. ड्रग्स पार्टी सुरू होताच एनसीबीने धडक कारवाई सुरू केली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या पथकांनी अनेक ड्रग्स तस्कारांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मुंबईत ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहे. अशाच मुंबईच्या धर्तीवरून निघून मोकळ्या समुद्रात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, एनसीबीने मोठ्या शिताफीने ही पार्टी उधळून लावली आहे. कधीकाळी होती थेट 'मातोश्री'वर एंट्री, कदमांशी फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे कोण? मुंबईच्या अरबी समुद्रात एका आलिशान क्रुझवर फॅशन शोच्या नावाखाली ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश अंमली विरोधी पथक अर्थात NCB ने केला आहे. या क्रुझवर जवळपास 1500 लोक होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. नव्या माहितीप्रमाणे हे क्रुझ आजपासून मुंबईपासून गोव्याला 3 दिवसांसाठी रवाना होणार होते. मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना इतर अधिकाऱ्यांसह प्रवासी म्हणून उभ्या असलेल्या जहाजावर पोहोचल्याची टीप मिळाली. जेव्हा जहाज  मुंबईहून निघाले आणि मध्य समुद्रात पोहोचेल, तेव्हा पहिल्या पार्टीला सुरुवात झाली आणि जिथे ड्रग्जचे सेवन केले जात होते. त्यानंतर आधीपासून उपस्थितीत असलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पार्टीचा पर्दाफाश केला.  शेवटचे सात उरले असून अजूनही चौकशी सुरू आहे. काय घडलं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात  Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. पैशांसाठी काहीही! ATMसमोर डोकं टेकलं, हात जोडले; तरुणीने काय काय केलं पाहा VIDEO एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.  पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास 1500 लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठे व्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे. NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. आतापर्यंत या कारवाईमध्ये 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अजूनही चौकशी सुरू आहे.
  Published by:sachin Salve
  First published: