• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आजही तोडगा नाही, अनिल परबांनी केलं शेवटचं आवाहन

BREAKING : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आजही तोडगा नाही, अनिल परबांनी केलं शेवटचं आवाहन


एखादी गोष्ट कोर्टासमोर असेल तर जास्त वेळ आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे एसटी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

एखादी गोष्ट कोर्टासमोर असेल तर जास्त वेळ आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे एसटी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

एखादी गोष्ट कोर्टासमोर असेल तर जास्त वेळ आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे एसटी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

 • Share this:
  o मुंबई, 13 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर (st bus strike) आजही तोडगा निघू शकला नाही. आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (bjp mla gopichand padalkar) यांच्यासोबत बैठक पार पडली. पण, या बैठकीत अजून कोणताही निर्णय होऊ शकला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अनिल परब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विलीनीकरण मागणी अतिशय आग्रही होती. मात्र ही मागणी मान्य करु शकत नाही. कारण न्यायालयाचा आदेश नुसार समिती गठीत केली आहे. समितीचा कालावधी कमी करू असं आम्ही सांगितलं आहे. १२ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळावे अशी मागणी त्यांची आहे. त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे, असं परब यांनी सांगितलं. माणूसकीला पडला विसर! Uber ने असं काही केलं की कोर्टानेही व्यक्त केली नाराजी एखादी गोष्ट कोर्टासमोर असेल तर जास्त वेळ आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे एसटी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत. वेतन वाढ मागणी आहे.शासनाच्या प्रमाणे वेतन यावर किती बोजा येतो याचा विचार करुन निर्णय घेणार आहोत. आता ते पुन्हा एकदा कामगार यांच्या सोबत चर्चा करायाला गेले आहे. आडमुठी भूमिका घेतली नाही पाहिजे. मी कधी ही त्यांना भेटायला तयार आहे, असंही परब यांनी सांगितलं. दोन वर्षात एसटीच्या नुकसानीचा आढावा त्यांच्या समोर ठेवण्यात आला आहे.संप चालण हे एसटी आंणि कामगार यांच्या दृष्टीने योग्य नाही. काही कामगार हे कामावर परत येण्यासाठी तयार आहे. त्यांना पोलीस संरक्षण देऊन कामावर हजर होऊ देणार आहे, असंही परब यांनी सांगितलं. ही आता जी लोक बोलत आहेत ती संघटना व्यतिरीक्त बोलत आहेत. बैठकीला भाजपची लोक येत आहे, कर्मचाऱ्यांची संघटना आलेली नाही, असंही परब यांनी सांगितलं. पत्नीने दिला त्रास; त्रस्त पतीने उचललं भयावह पाऊल,24 तासात 3 वेळा केलं असं कृत्य 'अवमान याचिका आहे कारण तो आमचा अवमान नाही तर कोर्टाचा अपमान झाला आहे. कमिटी जोपर्यंत अहवाल देत नाही तोपर्यंत काही निर्णय घेता येणार नाही' असंही परबांनी स्पष्ट केलं. तर, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळत ते एसटी कर्मचारी यांना मिळाल पाहिजे, यावर काही निर्णय झाला नाही. समिती नेमली आहे. त्यामुळे त्यात काही करता येणार नाही असं परिवहन विभागाच्या वतीने सांगितलं आहे. समितीचा कालावधी कमी करावा अशी आम्ही मागणी केली आहे. आता आम्ही आझाद मैदानावर जाऊन माहिती देणार आहोत, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. विलीनीकरण करा अशी मागणी होत आहे काही कालावधी दिला तर आम्ही त्यावर चर्चा करू. महाविकास आघाडी सरकार काय म्हणते त्याला मी काडीची किंमत देत नाही जर कर्मचारी म्हणाले की, भाजपचे नेते आमची माथी भडकावत आहे तर आम्ही एका मिनिटांत बाहेर पडू, असंही पडळकर म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published: