मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईच्या समुद्रात आढळलेल्या 'त्या' संशयास्पद बोटीबद्दल नवीन माहिती समोर

मुंबईच्या समुद्रात आढळलेल्या 'त्या' संशयास्पद बोटीबद्दल नवीन माहिती समोर

पालघरच्या समुद्रामध्ये एक बोट सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.

पालघरच्या समुद्रामध्ये एक बोट सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.

आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मोहन जाधव, प्रतिनिधी

पालघर, 01 एप्रिल : मुंबई जवळील पालघरच्या समुद्रामध्ये एक बोट सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली गेली होती. पण स्थानिक पोलीस आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता या बोटीत कुणीही पाकिस्तानी नागरिक नसल्याचे निष्पन्न झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जवळील पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळली. मुंबई आणि पालघर किनारपट्टीपासून 44 नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे या बोटीमध्ये कोणतीही पाकिस्तानी व्यक्ती आढळून आली नाही. हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे.

जलराणी असं या बोटीचं नाव आहे. ही बोट उत्तनमधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. 2 वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेनं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.

(देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगात वाढ, WHO चा भारताबाबत मोठा इशारा)

आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती, मात्र यातील सर्वच्या सर्व 15 खलाशांची हे पाकिस्तानी नसल्याचे समोर आहे. या सर्वांकडे आधार कार्ड असल्याचे समोर आले आहे, असं कोलासो यांनी सांगितलं.

(डोंबिवली पोलिसांना 1 एप्रिलच्या दिवशी आला फोन, घटनास्थळी पोहोचले आणि....)

ही बोट मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटिशी संपर्क साधण्यात आला असून उत्तन किनारी तिने परतावे, अशा सूचना दिली आहे. या बोटीला किनाऱ्यावर येण्यासाठी रात्र होणार आहे.

First published:
top videos