मुंबई 04 फेब्रुवारी : जगातल्या मोठ्या आणि देशातली सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. तब्बल 33 हजार 441 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीपेक्षा तो 2748 कोटींनी वाढलाय. ही 8.95 टक्के वाढ आहे. पायभूत सुविधा आणि इतर गोष्टींशिवाय महापालिकेने एक मोठी योजना आखली असून 'स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई'नंतर आता 'आनंदी मुंबई'ची घोषणा बजेटमध्ये करण्यात आलीय. 2030 पर्यंत मुंबई शहर आनंदी करण्याची योजना आखण्यात आली असून त्यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या बजेटचा आकार हा देशातल्या अनेक छोट्या राज्यांच्या बजेट एवढा आहे. त्यामुळे मुंबईच्या बजेटकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. यावर्षी महापालिकेने कुठलाही करत लादलेला नाही त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
आणखी काय आहे बजेटमध्ये?
बेस्टला येत्या वर्षात पालिका 1500 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. या आधी पालिकेने 1941कोटी बेस्टला दिले आहेत. पाण्याच्या योजनेतून पिंजाळ प्रकल्पाला वगळले आहे. केवळ गगोर्ई प्रकल्पाचं उल्लेख केला आहे. त्यासाठी 503 कोटी दिले आहे.
गेल्या 5 वर्षांमध्ये 25000 झाडे तोडण्यासाठी पालिकेने मान्यता दिल्याचं उघड झालंय. या वर्षी 3236 झाडे तोडायला परवानगी दिली आहे. मियावाकी पद्धतीने हे नुकसान भरून काढू असं आश्वासन देण्यात आलंय.आरोग्यासाठी पालिकेने 4260 कोटी रुपये तरतूद केली आहे.
धक्कादायक: उच्चभ्रु सोसायतीत भामटा करता होता लहान मुलांसोबत लैंगिक चाळे
मुंबई महापालिका गेली दोन वर्ष रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी वेगळा निधी काढत नाही. त्यापूर्वी प्रतिवर्ष 60 ते 80 कोटी रुपये हे खड्डे भरण्यासाठी राखून ठेवले जात असे. नंतर पालिकेने या रस्त्यांवर जास्त खड्डे आहेत असे रस्ते सिमेंटचे करण्याचे ठरविले.
यावर्षी खड्डे नाही असा दावा करत, महापालिकेने खड्डे दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा अशी ही योजना एक नोव्हेंबरपासून सुरू केली होती.
या योजनेअंतर्गत पालिकेने पहिल्याच दिवशी बाराशे खड्डे भरले होते आणि पाचशे खड्डे भरता आले नाही म्हणून लोकांना बक्षीस दिलं होतं.
नवनीत राणाची सनी देओल स्टाइल, महिलांच्या प्रश्नावर लोकसभेत आक्रमक
चोवीस तासाच्या आज खड्डे भरती अशी ही योजना होती सरतेशेवटी पालिकेने 72 लोकांना 36 हजार रुपये दिले होते.
मुंबई महापालिकेचं धोरण आता आनंदी मुंबई असेल. 2030 पर्यंत आनंदी मुबई करणे हे उद्दीष्ट ठेवण्यात आलंय.
रस्ते वाहतूक आणि पुलांसाठी- २६९९ कोटी. कोस्टल रोड साठी २००० कोटी. बेस्टला १५०० कोटींच अर्थ सहाय्य. आरोग्य वर १०४९ कोटी खर्च. पर्जन्य वाहिन्या साठी ९१२ कोटी. कचऱ्यासाठ्ठी ६१७ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.