मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ

मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ

आरटीआय अंतर्गत 2013 पासून 2017 पर्यंत मुली, महिला, पुरुष यांच्या अपहरण आणि हरवल्याची आकडेवारी मागवली होती

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : देशभरात कठुआ बलात्कार-हत्या प्रकरणामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत 2013 पासून मुलींच्या अपहरणाचं प्रमाण हे 15 पटीनं वाढल्याची धक्कादायक माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आलीये.

आरटीआय कार्यकर्ता शकिल अहमद यांनी आरटीआय अंतर्गत 2013 पासून 2017 पर्यंत मुली, महिला, पुरुष यांच्या अपहरण आणि हरवल्याची आकडेवारी मागवली होती. त्यातूनचही धक्कादायक माहिती समोर आलीये.

2013 पासून 2017 पर्यंत एकूण 3390 मुलांचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 3131 मुले मिळाली आहेत. तरी अजूनही 259 मुले मिळाली नाहीत. तर  2013 पासून 2017 पर्यंत एकूण 5056 मुलींचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 4686 मुली मिळाल्या आहेत. तरी अजूनही 370 मुली मिळालेल्या नाहीत.

मुंबईत अपहरण आणि हरवल्याची आकडेवारी

2013 पासून 2017 पर्यंत एकूण 3390 मुलांचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 3131 मुले मिळाली आहेत. तरी अजूनही 259 मुले मिळाली नाहीत.

- सन 2013 पासून सन 2017 पर्यंत एकूण 5056 मुलींचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 4686 मुली मिळाल्या आहेत. तरी अजूनही 370 मुली मिळालेल्या नाहीत.  

- सन-2013 पासून सन-2017 पर्यंत एकूण 6510 पुरुष हरवले आहे. त्यात आतापर्यंत 5322 पुरुष मिळाले आहेत. तरी अजूनही 1188 पुरुष मिळाले नाहीत.

- सन-2013 पासून सन-2017 पर्यंत एकूण 2839 स्त्रिया हरवल्या आहेत. त्यात आतापर्यंत 2309 स्त्रिया मिळाल्या आहेत. तरी अजूनही 530 स्त्रिया मिळाल्या नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 05:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading