मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /...मग लाच देणाऱ्या बारमालकांना अटक का नाही? देशमुखांवर कारवाईमुळे काँग्रेसचे ईडीला 4 सवाल

...मग लाच देणाऱ्या बारमालकांना अटक का नाही? देशमुखांवर कारवाईमुळे काँग्रेसचे ईडीला 4 सवाल

अनेक वेळा चौकशी बोलावून देखील अनिल देशमुख आले नाहीत, त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

अनेक वेळा चौकशी बोलावून देखील अनिल देशमुख आले नाहीत, त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटची किंमत 2004 मध्ये दिली गेली तर तो फ्लॅट या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो?

मुंबई, 17 जुलै : 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची मालमत्ता ईडीने (ed) जप्त केली आहे. या कारवाईच्या विरोधात महाविकास आघाडीच्या (mva goverment) नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.  'बारमालकांकडून कथितरित्या जमा केलेले पैसे अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (sachin sawant) यांनी केला आहे.

'गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा छळ करण्यासाठी व विरोधी पक्षाच्या सरकारांना बदनाम करण्यासाठी केला जात आहे. अनिल देशमुख यांची ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी हा मोदी सरकारच्या राजकीय दबावतंत्राचा असून, या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदनाम व अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे', अशी टीका  सावंत यांनी केली.

Kriti Sanon ठरतेय स्टाईल आयकॉन; लेटेस्ट Photos पाहून मिळेल फॅशन इन्स्पिरेशन

राष्ट्रीय तपास यंत्रणांची कार्यपद्धती ही सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिसून आली आहे तशीच कार्यपद्धती या प्रकरणात ईडीने अवलंबली आहे. खोटी माहिती माध्यमांमध्ये पसरवणे, अफवांचा प्रसार करणे, माध्यमातून आलेल्या खोट्या बातम्यांचे जाणिवपूर्वक खंडन वा समर्थन न करणे हे सुशांत राजपूत प्रकरणात दिसून आले तेच आता दिसत आहे म्हणूनच चौकशीतील त्रुटींवर बोट ठेवणारे काही मुद्दे ट्वीट करून त्यांनी ईडीला चार प्रश्न विचारले आहेत.

भरदिवसा दरोडा; मणप्पुरम गोल्ड लोन कंपनीच्या ऑफिसमध्ये तब्बल सव्वा 8 कोटींची चोरी

1. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कंपनीच्या उरण येथील जमिनीची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत असून सदर जमीनीची किंमत 300 कोटी आहे अशा काही माध्यमातून बातम्या आल्या होत्या. ईडीने सदर मालमत्ता जप्त करताना ही जमीन 2005 मध्ये खरेदी केली गेली आणि 2.67 कोटी किंमतीची आहे असे जाहीर केले आहे. मग या वावड्यांना वेळीच ईडीने उत्तर का दिले नाही?

2. ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटची किंमत 2004 मध्ये दिली गेली तर तो फ्लॅट या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो?

3. सचिन वाझेने बारमालकांडून 4.70 कोटी रूपये जमा करून अनिल देशमुख यांना दिल्याचा जबाब दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. याच वसुलीतून देशमुख कुटुंबाने काही मालमत्ता खरेदी केल्या, असे चित्र रंगवले जाते आहे. परंतु, ईडीने ताब्यात घेतलेली जमीन, फ्लॅट आदी मालमत्ता २००४ व २००५ मध्ये खरेदी झालेल्या आहेत. त्या मालमत्तांचा या प्रकरणाशी संबंध कसा जोडता येईल व ज्या बारमालकांनी पैसे दिले असे ईडीला वाटते त्यांच्यावर कारवाई अद्याप का केली नाही?

4. दरमहा 100 कोटी गोळा करण्याबाबत सचिन वाझेला दिलेल्या कथित आदेशाची तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना माहिती होती, तर त्याबाबत त्यांनी वेळीच कोणतीही कारवाई न केल्याबद्दल त्यांची चौकशी का होत नाही?

First published:
top videos

    Tags: ED