• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'मग योग्य कोण, पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही?' जयंत पाटलांचा फडणवीसांना सणसणीत टोला

'मग योग्य कोण, पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही?' जयंत पाटलांचा फडणवीसांना सणसणीत टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला होता. यावेळी...

 • Share this:
  मुंबई, 09 मे: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी महाराष्ट्राच्या कोरोना (Maharashtra Corona cases) लढाईचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) टीका सुरूच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'योग्य कोण, माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही?' असा सणसणीत टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत असताना राज्य सरकारने चांगल्या उपाययोजना केल्यात, असं म्हणत कौतुक केलं. तर दुसरीकडे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे, असा आरोप करत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट रिट्वीट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सणसणीत टोला लगावला आहे. 'देवेंद्र फडणवीसजी माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड 19 चा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल, अशी आठवण करून सणसणीत टोला लगावला. तसंच, आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही? असा सवाल विचारत जयंत पाटलांनी आणखी एक टोला लगावला. 'हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा' तर दुसरीकडे, भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करतील, अशी शक्यताच फेटाळून लावली आहे. 'मुंबई आणि महाराष्ट्राची कोविड नियंत्रणाची परिस्थिती वाईट असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही. हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा वाटतो!' असा दावाच दरेकर यांनी केला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: