नाट्यमहर्षी इब्राहिम अल्काझी यांचं निधन; नसीरुद्दीन, ओम पुरींसारख्यांचे होते गुरू

नाट्यमहर्षी इब्राहिम अल्काझी यांचं निधन; नसीरुद्दीन, ओम पुरींसारख्यांचे होते गुरू

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) नावारूपाला आणलेले माजी संचालक आणि नाट्यमहर्षी पद्मभूषण इब्राहिम अल्काझी यांचं आज वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं.

  • Share this:

मुंबई, 4 ऑगस्ट : दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) नावारूपाला आणलेले माजी संचालक आणि नाट्यमहर्षी पद्मभूषण इब्राहिम अल्काझी यांचं आज वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर अशा अनेक दिग्गजांचे ते गुरू होते.

गिरीश कार्नाट, विजय तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश यांची एकाहून एक सरस नाटकं इब्राहिम अल्काझी यांनी बसविली आणि गाजवली. अल्काझींनी बसवलेलं कार्नाडांचं तुघलक, धर्मवीर भारतींचं अंधा युग आजही जागतिक रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांमध्ये मोडतात. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या उच्च नागरी सन्मानाने गौरवले होते.

इब्राहिम अल्काझींचा जन्म पुण्यात 1925 साली झाला. वडील सौदीतले गर्भश्रीमंत. आई कुवैती. पण अल्काझी जन्माने पारशी होते आणि कर्माने नाट्यधर्मी. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यात आणि मराठीतून झाल्यामुळे शेवटपर्यंत त्यांना मराठी रंगभूमीबद्दल आणि कलाकारांबद्दल जिव्हाळा होता. इब्राहिम अल्काझी बी. ए.चा अभ्यास पूर्ण करून रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट (म्हणजे RADA) या अग्रगण्य संस्थेमधे रंगभूमी विषयक रीतसर अव्वल शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 4, 2020, 6:50 PM IST
Tags: theatre

ताज्या बातम्या