News18 Lokmat

जलयुक्त शिवार योजनेचं काम शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्हतं -शरद पवार

तात्काळ दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि दुष्काळग्रस्त भागात पाणी नियोजन, जनावरांसाठी चारा याचा विचार करावा

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2018 08:55 PM IST

जलयुक्त शिवार योजनेचं काम शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्हतं -शरद पवार

सागर कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 23 आॅक्टोबर : राज्यात काही जिल्ह्यात गेलो तिथली दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी, ही दुष्काळसदृष्य परिस्थिती नसून दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच जलयुक्त शिवार योजनेचं काम शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्हतं, कोट्यवधी रूपये खर्च करून प्रसिद्धीच जास्त झाली अशी टीकाही पवार यांनी केली.

मुंबईत ग्रंथाली प्रकाशनच्या वतीने पत्रकार संदीप काळे यांच्या मु. पो. आई या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. सुमारे ३० संपादक यांनी आई विषयी लेखन या पुस्तकात केले. खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, अभिनंदन थोरात यावेळी उपस्थित होते.यावेळी शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.

राज्यात भुजल पातळी खालावण्यास जलयुक्त शिवार योजना जबाबदार असल्याचा आरोप होतोय. यावर शरद पवारांनी भाष्य केलं. जलयुक्त शिवार योजनेचं काम शास्त्रशु्द्ध नव्हते, या योजनेचे काम कमी झाले आणि प्रसिद्धी जास्त झाली. मुळात या योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च झाले अशी टीका पवार यांनी केली.

Loading...

राज्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट आहे. सरकारकडून अजूनही दुष्काळसदृश्य परिस्थिती म्हणून हाताळलं जातंय पण परिस्थिती त्याही पलीकडे आहे. राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी. तात्काळ दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि दुष्काळग्रस्त भागात पाणी नियोजन, जनावरांसाठी चारा याचा विचार करावा अशी मागणी पवार यांनी केली.

दुष्काळाच्या अशा स्थितीत केंद्र मदत करत असते पण सध्या अशी परिस्थिती आता दिसत नाही अशी टीकाही पवार यांनी केंद्र सरकारवर केली.

चाऱ्यात भ्रष्टाचार होतो की नाही माहिती नाही पण जनावरांना चारा उपलब्ध करावा अशीही मागणी पवारांनी सरकारकडे केली.

================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2018 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...