मुंबई, 24 डिसेंबर : गोरेगाव (Goregaon) येथील दिंडोशी पूर्वेकडील बघेश्वरी मातेच्या मंदिराजवळील लग्नाचं मंडप आगीत (Fire near Bagheshwar Temple in Goregaon) जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिंडोशी पूर्वेकडील बघेश्वरी मातेच्या मंदिराजवळ लग्नाचं मंडप बांधण्यात आलं होतं. या आगीत अख्खा मंडप जळून खाक झाला आहे.
भागातील आगीच्या ज्वाला दिसत आहेत. या आगीबाबत सूचना मिळताच अग्निशामकाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. अद्याप आग विझविण्याचे काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
गोरेगाव येथील दिंडोशी पूर्वेकडील बघेश्वरी मातेच्या मंदिराजवळील लग्नाच्या मंडपाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. 1/2 pic.twitter.com/KMdRQEKE8x
मंदिराच्या शेजारी पत्र्याचा एक शेड तयार केला होता. तेथे आग लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुदैवाने यामध्ये मंदिराचं नुकसान झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी हजर झाले. सध्या अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्याचे काम करीत आहे. याशिवाय जीवित हानी झाल्याची माहितीही समोर आलेली नाही.