'ट्वीट डीलिट कर नाही तर...' नगरसेवकाचा महिला पत्रकाराला धमकी वजा इशारा

'ट्वीट डीलिट कर नाही तर...' नगरसेवकाचा महिला पत्रकाराला धमकी वजा इशारा

घाटकोपर मेट्रो स्टेशनवर नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी गोंधळ घालून महिला पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. त्यांच्या व्हिडीओ व्हायरलं झाला होता. मात्र तसं काही झालंच नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

  • Share this:

ठाणे,17 जानेवारी : ठाण्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य विक्रांत चव्हाण यांनी मुंबईतील एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरलं झाल्यानतंर ठाण्याचे काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण चांगलेच अडचणीत सापडले होते. चौहुबाजूनं टिका होत असल्यानं अखेर विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात बाजू मांडली.

वैयक्तिक कारणासाठी आपण मुंबईत गेलो होते. मेट्रोनं घाटकोपरहून जात असताना आपलं टोकनं मशीनमध्ये अडकलं. त्यामुळं मला मनस्ताप सहन करावा लागला. त्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी सहकार्य केलं. मात्र माझं मेट्रोच्या लोकांशी संभाषण सुरू असताना एक महिला तिते आली आणि त्यांनी आपला व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. मात्र आपण त्या महिलेला व्हिडीओ शुट न करण्यास सांगितलं. तसेच ती महिला मोबाईल सतत माझ्या चेहऱ्यासमोर धरत होती. त्यामुळं आपण तो मोबाईल बाजूला केला असल्याचा खुलासा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. दुसरी तिथे काहीही झालं नाही असंही विक्रांत चव्हाण म्हणाले.

आपण केवळ महिलेचा मोबाईल बाजूला केला. मात्र त्या महिलेनं त्याचं भांडवल केल्याचं नगरसेवक विक्रांत चव्हाण म्हणाले. तसेच आपण मोबाईल बाजुला करत असल्याचा व्हिडीओ त्या महिलेनं सोशल मीडियावर पोस्ट करून असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्याचं विक्रांत चव्हाण यांचं म्हणण आहे. येवढच नाही तर महिला पत्रकारानं ट्विटवर आपल्याविषयी चुकीचा मजकूर पोस्ट केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच महिलेनं त्यांच्या ट्विटममध्ये आपला संबंध  ठाण्याचे दिवंगत बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्येशी असल्याचा आरोप केला तसेच  या प्रकरणी आपण आरोपी असल्याचं पोस्ट  महिलेनं करून आपली बदनामी केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. महिला पत्रकार तबस्सुम बरगरवाला यांनी बदनामी कारक ट्विट त्वरीत मागे घ्यावं अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे.

विक्रांत चव्हाण यांनी घाटकोपर मेट्रो स्टेशनवर काहीही झालेलं नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महिला पत्रकारानं चुकीची पोस्ट टाकून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळं महिला पत्रकार  बरनगरवाला आता विक्रांत चव्हाण यांना काय उत्तर देणार हेच आता पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 04:07 PM IST

ताज्या बातम्या